मावळमध्ये भाजप समर्थकांचं थेट शिंदेंच्याच शिवसेनेला आव्हान, नाशिक-कोल्हापुरात काय आहे स्थिती
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पण अद्याप अनेक ठिकाणचं उमेदवार ठरलेले नाहीत. त्यामुळेच जागांबाबत अजूनही चर्चा सुरु असल्यातं बोललं जात आहे. महायुती झाल्याने एकाच मतदारसंघात अनेक इच्छूक आहेत.

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मावळ लोकसभेसाठी भाजप समर्थक शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देऊ लागले आहेत. महायुतीत मावळची जागा शिवसेनेकडे आहे. याआधी 2 वेळा विद्यमान खासदार बारणे यांनी प्रतिनिधीत्व केलं आहे. सध्या बारणे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. मात्र यंदा मावळमध्ये भाजपमय वातावरण असल्याचा दावा करत भाजप समर्थक करत असून मावळची जागा भाजपला देण्याची मागणी करत आहेत. तर मावळातून आपल्यालाच पुन्हा संधी मिळण्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
मागच्या निवडणुकीत काय होते स्थिती
मावळ लोकसभेत पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या ६ विधानसभा येतात. 2019 ला शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार लढले होते. श्रीरंग बारणे यांना 7,20,663 तर पार्थ पवारांना 5,04,750 मतं पडली होती बारणे यांचा २ लाखांहून जास्त मतांनी विजय झाला होता.
शिवसेनेच्या बारणेंना पनवेल, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या ५ भागात लीड होतं. तर पार्थ पवार फक्त कर्जत भागात लीड घेऊ शकले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे नेतेही मावळच्या जागेचा आग्रह धरत होते. मात्र आता मावळवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मवाळ झाल्याचं दिसतंय.
नाशिकमध्ये होऊ शकते अदलाबदल
तिकडे नाशिकमध्ये मविआत जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं होतं., मात्र आव्हानात्मक लढत व्हावी असं कारण देत आता गोकूळ पिंगळे यांचं नाव चर्चेत आलं आहे. मात्र पिंगळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होवून ते उमेदवार ठरणार का., याबद्दल शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापुरात कोणाला संधी
कोल्हापूरच्या जागेवर भाजपची चर्चा असताना शिंदेंचे खासदार संजय मंडलिकांनाही दावेदारी कायम ठेवली आहे. तसंच छत्रपती शाहूंना लोकसभेत उतरवण्यामागे शरद पवारांचं षडयंत्र असल्याचा आरोपही मंडलिकांनी केला आहे. त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
