AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याने उडवली उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली

BJP Politics : "56 लक्ष शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी देत आहोत,त्यात काही उणिवा नको, कोणी सुटता कामा नये, याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे"

रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याने उडवली उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 04, 2026 | 2:00 PM
Share

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्या रामरक्षा आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दादरमधील मंदिरापासून हे आंदोलन सुरु होणार आहे. अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. नुकतीच ठाकरे गटात मोठी फूट पडली. सहा खासदार, एक आमदार साथ सोडून निघून गेले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा हाती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. पण भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाची खिल्ली उडवली. “उद्धव ठाकरे काय म्हणतील आणि काय म्हणतात त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. पण रामरक्षा पठण करत असतील तर मला विश्वास आहे की जो जो रामरक्षा पठण करतो प्रभू राम त्यांचं रक्षण करतात. आता रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत असा मला विश्वास आहे” अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

“निश्चितपणे शिलापूजन करताना शिला घेऊन आम्ही गावोगावी फिरलो, तेव्हा तर व्यवस्थाही नव्हती. तेव्हा स्कूटरवर आम्ही गावात गेलो, कार सेवेत गेलो, बाबरी मज्जिद जेव्हा ध्वस्त होत होती. त्याचा मी साक्षीदार आहे” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. “माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी राम मंदिर यही बनायेंगे असा संकल्प मी विवाहातही केला होता” असं मुनगंटीवार म्हणाले.

योगी आरोपींना कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाहीत

“जर तिथे दानपात्रात चोरी झाली असेल देव त्याला जी शिक्षा द्यायची ते देईलच. पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक वेळा सांगितलं की कोणी कसाही माणूस असू द्या. पण राम मंदिरात चोरी करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही, योगी आरोपींना कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाहीत” असं मुनगंटीवार म्हणाले.

कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो

“56 लक्ष शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी देत आहोत,त्यात काही उणिवा नको, कोणी सुटता कामा नये, याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे” असं मुनगंटीवार म्हणाले. अमित साटम यांच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Follow Us
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट...
अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप
Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!
Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा