पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार, सांगलीतील महापौरपदाच्या निवडणुकीतून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीचा दावा

त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली. (BJP will expelled from western Maharashtra)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:44 PM, 23 Feb 2021
पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार, सांगलीतील महापौरपदाच्या निवडणुकीतून शिक्कामोर्तब; राष्ट्रवादीचा दावा

मुंबई : पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते. त्यानंतर सांगली महापौर विजयाने यावर शिक्कामोर्तब झालं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी दिली आहे. (BJP will be expelled in western Maharashtra said NCP Mahesh Tapase)

आज सांगली महापौरपदाची निवडणूक पार पडली. भाजपाचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि सांगली पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे, असेही महेश भारत तपासे यांनी सांगितले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये केली होती. पण पुणे पदवीधरची निवडणूक झाली. आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका महेश भारत तपासे यांनी केली आहे.

भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही, हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकासआघाडीने दाखवून दिले आहे, असेही महेश भारत तपासे यांनी स्पष्ट केले.

सांगलीच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे सात नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली, जी अखेर व्यर्थ ठरली.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा – 78)

  • भाजप – 41
  • अपक्ष – 2
  • काँग्रेस – 20
  • राष्ट्रवादी – 15

सत्ताधारी भाजपमध्ये फूट

महापौर-उपमहापौर निवडीवरुन सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले होते. (BJP will be expelled in western Maharashtra said NCP Mahesh Tapase)

संबंधित बातम्या : 

पालिका निवडणुकीत महाविकासआघाडी होणार की नाही? काँग्रेसने राष्ट्रवादी-शिवसेनेला धडकी भरवली

राज्य सरकार सूडबुद्धीने वागतंय, कोरोना नियमांच्या उल्लंघनावरील कारवाईवरुन भाजपचा आरोप

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली, महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी