AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार सूडबुद्धीने वागतंय, कोरोना नियमांच्या उल्लंघनावरील कारवाईवरुन भाजपचा आरोप

राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करीत असल्याची टीका भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

राज्य सरकार सूडबुद्धीने वागतंय, कोरोना नियमांच्या उल्लंघनावरील कारवाईवरुन भाजपचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 23, 2021 | 6:30 PM
Share

पुणे : कोरोनाच्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचं समर्थन होणार नाही, पण राज्य सरकार सूडबुद्धीने आणि पक्षपाती कारवाई करीत असल्याची टीका भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. सोमवारी पुण्यात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माञ अन्य राजकीय पक्षांचे कार्यकार्ये आणि नेते कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करीत नसल्याचा आरोप मुळीक यांनी केला आहे.(BJP’s Pune city president Jagdish Mulik criticizes the state government)

‘नाशिकमध्ये लग्नाला हजेरी लावल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यातील एक मंत्री कोविड पॉझिटीव्ह असल्याचं समोर येतंय. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस हेलिकॉप्टरमध्ये साजरा होतो. त्या पाठोपाठ त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं समजतं. त्या आधी त्यांचा राजकीय दौरा राज्यभर सुरु होता. त्यांच्या सभांची, कार्यक्रमांची सुरुवात विदर्भातून झाली आज तिथेच सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत,’ अशी टीका मुळीक यांनी केलीय.

‘काँग्रेस पक्ष मुंबईत शक्ती प्रदर्शन करतोय, रॅली काढतोय, पुण्यात राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. या कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. डिजिटल युगात कोणीही गोष्ट लपून राहात नाही’, असंही मुळीक म्हणाले. फक्त भाजपच्या नेत्यांवर सूड उगवायच्या भावनेने कारवाई करू नये, सर्वांना सारखे नियम लावावे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केलीय.

संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणात गेले काही दिवस मौन बाळगणारे शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवीचं गडावर पोहोचले. त्यावेळी राठोड समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असून, राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र “संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, प्रत्येकाने जबाबदारी पाळली पाहिजे होती”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

नवनीत राणा यांचाही सवाल

दुसऱ्यांकडे नियम आणि बोट दाखवताना राज्यातील मंत्र्यांनीही आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. आम्ही शिवजयंची साजरी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमधील नेत्यांचे जाहीर कार्यक्रम सुरु आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होऊ घातलं असतारा राष्ट्रवादीचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, यातून वेगळा संदेश जाऊ शकतो, असंही राणा यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले

धनंजय महाडिकांच्या अडचणीत वाढ, मुलाच्या शाही विवाह सोहळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

BJP’s Pune city president Jagdish Mulik criticizes the state government

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.