महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही: पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. (BJP will not get any success in efforts to topple Maharashtra government)

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही: पवार
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. (BJP will not get any success in efforts to topple Maharashtra government)

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.

हा तर सत्तेचा दुरुपयोग

पवारांनी यावेळी ईडीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. ईडीमार्फत कारवाई म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं पवार म्हणाले. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्यच नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने गेल्या महिन्यात एक वर्ष पूर्ण केलं आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसची विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपला वाटत होतं. पण तसे झालं नाही. भाजप आणि शिवसेनेने 2019मध्ये विधानसभेची निवडणूक एकत्र लढवली होती. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून वाद झाल्याने शिवसेनेने दोन्ही काँग्रेसशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण निर्माण करण्यासाठी शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. (BJP will not get any success in efforts to topple Maharashtra government)

संबंधित बातम्या:

शिवसेनेला पहिलं यश, धुळ्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला

…तर भविष्यात टाटा बिर्ला आमदार खासदार होतील, राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

भाजपच्या खासदाराकडून राष्ट्रवादीच्या आमदाराची निवड! समीकरण काय?

(BJP will not get any success in efforts to topple Maharashtra government)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.