AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताच्या क्षणाची मोठी बातमी, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची खाती ठरली, सूत्रांची माहिती

राज्यात पुढच्या 48 तासात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आताच्या क्षणाची मोठी बातमी, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची खाती ठरली, सूत्रांची माहिती
| Updated on: Nov 26, 2024 | 6:28 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचा 48 तासात नेता निवडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे दोन निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेता निवडीची बैठक ही 29 तारखेला होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची खातीदेखील ठरली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.

राज्यात पुढच्या 48 तासात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय राहणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “ही चांगली गोष्ट आहे. जेव्हाही नेत्याची निवड होते तेव्हा पक्षाची बैठक घेऊन, नेता निवडीचा जो नियम असतो त्या नियमाचं पालन करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तसंच होतं. पक्षाकडून निरीक्षक येतात. चर्चा होते आणि सर्वानुमते नेता निवडीची प्रक्रिया पार पडते. त्यामुळे निरीक्षक हे येतीलच. त्यानंतर नेता निवडीचा कार्यक्रम पार पडेल आणि नंतर नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल. त्यामुळे निरीक्षक येतील. त्यात शंका नाही”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील प्रमुख नेते घेतील. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.