धुळे ZP निकाल : धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता, महाविकासआघाडीचा पराभव

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धुळ्यात भाजपने एकतर्फी विजय (Dhule zilla parihad election result) मिळवलेला आहे.

धुळे ZP निकाल : धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता, महाविकासआघाडीचा पराभव
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 8:10 PM

धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धुळ्यात भाजपने एकतर्फी विजय (Dhule zilla parihad election result) मिळवलेला आहे. येथे 56 जागांपैकी 39 जागांवर एकट्या भाजपचा विजय झाला आहे. राज्यात आज (8 जानेवारी) सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल समोर आला. यामध्ये सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव (Dhule zilla parihad election result) झाला आहे. फक्त धुळे जिल्ह्यात भाजपला एकहाती सत्ता मिळालेली आहे.

धुळे जिल्ह्यातील 56 जागांचा निकाल हाती आला आहे़. यामध्ये 39 जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केला आहे. यामध्ये शिरपूर तालुक्यात सर्वच्या सर्व 14 जागा, शिंदखेडा तालुक्यात 8, साक्री तालुक्यात 7 आणि धुळे तालुक्यात 10 याप्रमाणे 39 जागांवर विजय मिळवला.

या निवडणुकीत काँग्रेसने 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा तर शिवसेनेने 4 जागा मिळविल्या आहेत. याशिवाय अपक्ष 3 उमेदवार यात विजयी झाले आहेत. या निकालानंतर बहुमतांची 29 जागांची मॅजिक फिगर भाजपने गाठली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे.

दरम्यान, धुळे जिल्हा परिषदेवर जरी भाजपची सत्ता आली असली, तरी राज्यातील इतर पाच ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. विधानसभा निवडणुकांनतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे जिल्हा परिषदेतही महाविकासआघाडीचा बोलबाला सुरु असल्याचे दिसत आहे. याचा मोठा फटका भाजपला बसला आहे.

धुळे जिल्हा परिषद निकाल

जिल्हा परिषद एकूण जागा -56

जाहीर झालेला निकाल-56

  • राष्ट्रवादी 03
  • भाजपा -39
  • काँग्रेस -07
  • शिवसेना -04
  • अपक्ष 03
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.