Video | संजय राठोड यांच्याविरोधात निदर्शने, काळे झेंडे दाखवून कारवाईची मागणी

पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना संजय राठोड यांच्या ताफ्याला भाजप युवा मोर्चाने काळे झेंडे दाखवले. (bjp yuva morcha sanjay rathore)

  • चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 18:50 PM, 23 Feb 2021
Video | संजय राठोड यांच्याविरोधात निदर्शने, काळे झेंडे दाखवून कारवाईची मागणी

यवतमाळ : तब्बल 15 दिवसांपासून अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड (sanjay rathore) 16 व्या दिवशी सर्वांसमोर आल्यानंतर त्यांच्यावर भाजपने घणघाती टीका केली. पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना त्यांच्या ताफ्याला भाजप युवा मोर्चाच्या (BJP yuva morcha) पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी राठोड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. (BJP yuva morcha protested and showed black flag against Sanjay Rathore)

पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. यातील आवाज हा वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा भाजपने केला होता. संजय राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपने लावून धरली होती. त्यानंतर संजय राठोड मागील काही दिवसांपासून अज्ञातवासात गेले होते. आज (23 फेब्रुवारी) त्यांनी पोहरा गडावर जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मोठे शक्तिप्रर्शन केले. मात्र, पोहरादेवी येथून परतत असताना त्यांना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.

संजय राठोड पोहरादेवीचे दर्शन घेऊन यवतमाळमध्ये दाखल होताच त्यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. हे आंदोलन युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी राठोड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भाजप युवा मोर्चाने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

संजय राठोड यांना अशा प्रकारे काळे झेंडे दाखवण्यात आले, पाहा व्हिडीओ :

 

इतर बातम्या :

संजय राठोडांनी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं, पोहरादेवी गर्दीवर शिवसेनेचं पहिलं भाष्य

Sanjay Rathod press conference | 16 दिवसांनी माध्यमांसमोर, संजय राठोड यांचा शब्द अन् शब्द, जसाच्या तसा

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

(BJP yuva morcha protested and showed black flag against Sanjay Rathore)