AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik| नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी भाजपचे सर्वाधिक 78 उमेदवार रिंगणात; रणधुमाळी टिपेला…!

नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीमध्ये आघाडीत फाटाफूट झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

Nashik| नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी भाजपचे सर्वाधिक 78 उमेदवार रिंगणात; रणधुमाळी टिपेला...!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 10:49 AM
Share

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या एकूण 87 जागांसाठी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येथे भाजपने सर्वाधिक 78 ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 61, शिवसेने 46 आणि काँग्रेस 33 जागांवर लढत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतीमध्ये आघाडीत फाटाफूट झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

311 उमेदवार रिंगणात

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.

21 डिसेंबर रोजी मतदान

नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी आदी नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे रखडलेल्या दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीचीही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. येथेही 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

निफाडमध्ये तिरंगी लढत

निफाडमध्ये नगरपंचायतीच्या 14 जागा आहेत. या ठिकाणी सत्ताधारी निफाड शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसने या ठिकाणी 5 प्रभागात आणि बहुजन समाज पक्षाने 2 जागांवर उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे पेठ आणि सुरगाणा येथे माकपने बड्या पक्षांना जेरीस आणले आहे. कळवणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीन जागी उमेदवार दिले आहेत.

सुरगाणा येथे सारेच रिंगणात

सुरगाणा येथे 17 प्रभाग आहेत. या ठिकाणी शिवसेना, भाजप, माकप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारेच पक्ष रिंगणात आहेत. सोबतच इथे दोन महिला माजी नगराध्यक्षांसह सहा महिला नगरसेवक आणि तीन माजी नगरसेवक निवडणूक लढवत आहेत. पेठ नगरपंचायतीमध्ये बहुतांश नवे चेहरे आहेत. दिंडोरी येथे 17 पैकी 14 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे सुजित मुरकुटे बिनविरोध निवडून आले आहेत. तर दोन प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी असल्याने त्या जागेवर निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

इतर बातम्याः

Nashik| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये गोदावरी उत्सव सुरू; विविध कलांमधून नदीसूक्त उलगडणार…!

Nashik| नाशिक विभागातील 170 आश्रमशाळा तब्बल 2 वर्षांनी सुरू; पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.