Nashik| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये गोदावरी उत्सव सुरू; विविध कलांमधून नदीसूक्त उलगडणार…!

गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मयुरा मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.

Nashik| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये गोदावरी उत्सव सुरू; विविध कलांमधून नदीसूक्त उलगडणार...!
नाशिकमध्ये गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे व सौ. मयुरा मांढरे यांनी केले.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 9:34 AM

नाशिकः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये गोदावरी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. येत्या 21 डिसेंबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी गोदाकाठावर देवमामलेदार महाराज मंदिरासमोरून वारसा फेरीच्या झाली. यावेळी पूजा नीलेश यांचा सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. तर चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी व नदी संदर्भातील चित्रांचे सादरीकरण केले होते. याला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन

गोदावरी उत्सव व वारसाफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मयुरा मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालिका आरती आळे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. यावेळी नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासार-पाटील, आनंद बोरा, डॉ. अजय कापडणीस, महेश शिरसाट, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजन सोनवणे यावेळी उपस्थित होते.

सुलेखनातून नदीसूक्त

सकाळी साडेसात वाजता सुलेखनकार पूजा नीलेश यांनी नदीसूक्त हा विषय घेत आपल्या सुलेखनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी केलेल्या सुलेखनाची माहीत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी घेतली. यावेळी त्यांनी सुलेखनातून विविध नद्यांची नावे रेखाटली. यानंतर प्रा. सुरेखा बोऱ्हाडे यांनी यावेळी गोदावरी नदीविषयी एकपात्री नाटक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गजानन महाराज गुप्ते मंदिरात चित्रकार रमेश जाधव यांनी गोदावरी या विषयावर साकारलेली दीडशेहून अधिक चित्रांच्या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी भेट दिली. नाशिककरांनी या चित्र प्रदर्शनाचे कौतुक केले.

पुस्तक प्रसिद्ध करणार

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चित्रकार रमेश जाधव यांच्या चित्रांचे कौतुक करीत त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर काढलेल्या चित्रांचे पुस्तक जिल्हाप्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी मांढरे म्हणाले,‘गोदावरी नदी व त्याकाठची वारसास्थळे नाशिकची मोलाची संपत्ती आहे. ती जपण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. हा वारसा जपत आपल्याला विकास साधायला आहे.’ यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी वारसाफेरीनिमित्त आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. गोदावरीविषयी असलेल्या विशेष प्रेमामुळे नाशिकशी आपले नाते घट्ट झाले आहे. गोदावरी नदीबद्दल आपल्या सर्वांच्या मनात आदरभाव निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

अतिक्रमणांचा विळखा

सकाळी आठ वाजता वारसाफेरीला सुरुवात झाली. यावेळी कुंडांचे अभ्यासक देवांग जानी यांनी गोदाकाठावरील कुंड आणि त्यांचा इतिहास यावेळी सांगितला. गोदावरी काठावरील कुंडांची माहिती देताना त्यांनी नकाशाच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी जानी म्हणाले,‘गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदी पात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू शकतो. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व कुंड पुन्हा निर्माण करता येतील का याचा अभ्यास व्हायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

गोदाकाठावर लोकसंस्कृती नांदते

नाशिकचे अभ्यासक रमेश पडवळ यांनी अश्मयुगीन इतिहास, नदीचे महत्त्व, नदी संस्कृती आणि नदीभोवतीच्या वारसास्थळांची माहिती दिली. पडवळ म्हणाले,‘आपली संस्कृती समजून घेण्यासाठी नाशिक शहराचा इतिहास समजून घेणे खूप गरजेचे आहे. अश्मयुगापासून नाशिकच्या गोदाकाठावर लोकसंस्कृती नांदते आहे. ही संस्कृती निर्माण होण्यासाठी गोदावरी नदी पोषक ठरते आहे. आजही नाशिककर गोदावरीशिवाय राहू शकत नाही. गोदाकाठची मंदिरे, वाडे, गढ्या आणि समाधी ही नाशिकची ओळख आहेत. ती विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले. गजानन महाराज गुप्ते मंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर वारसाफेरीला सुरुवात झाली. दोन तास चाललेल्या फेरीत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त सहभागी झाले होते. देवमामलेदार मंदिर, दुतोंड्या मारूती, अहिल्याराम मंदिर, कुष्ण मंदिर व नारोशंकर मंदिर अशी वारसाफेरी पार पडली.

असे होतील कार्यक्रम…

शुक्रवार, 17 डिसेंबर, सायं : 5.30 ते 7.00 व्याख्यान : गोदाघाटावरचे नाशिक : चेतन राजापूरकर. ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नाशिक

शनिवार, 18 डिसेंबर सकाळी : 7.00 वाजता : गोदाकाठचे पक्षी जीवन : संयोजन व मार्गदर्शन : प्रा. आनंद बोरा ठिकाण : गाडगे महाराज धर्मशाळा, गोदाघाट सायं : 5.30 ते 7.00 : व्याख्यान : जल प्रदूषण : डॉ. व्ही. बी. गायकवाड ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नाशिक

रविवार, 19 डिसेंबर, सायं : 5.30 ते 7.00 व्याख्यान : प्राचीन नाण्यांमधील नदी : डॉ. कैलास कमोद ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नाशिक

सोमवार, 20 डिसेंबर, सायं : 5.30 ते 7.00 व्याख्यान : नासिकची गोदावरी : डॉ. शिल्पा डहाके, गोदावरी अभ्यासक व तज्ज्ञ ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नाशिक

मंगळवार, 21 डिसेंबर, सायं : 5.30 ते 7.00 व्याख्यान : ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर : कारणे आणि परिणाम : प्रा. डॉ. प्रमोद हिरे. ठिकाण : दरबार हॉल, सरकारवाडा, सराफ बाजार, नाशिक

इतर बातम्याः

Nashik| गोदावरी एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वेगाड्या सुरू करा; खासदार गोडसे यांची मंत्री दानवे यांच्याकडे मागणी

Malegaon riots| मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.