AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…याच नैराश्याने काँग्रेस हरतेय…’,राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सींग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात मॅच फिक्सींग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लेखांतून केल्यानंतर राजकारण तापले आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

...याच नैराश्याने काँग्रेस हरतेय...',राहुल गांधी यांच्या निवडणूक मॅच फिक्सींग वक्तव्यावर नड्डा यांचा पलटवार
| Updated on: Jun 07, 2025 | 6:02 PM
Share

महाराष्ट्रातील साल २०२४ च्या विधानसभा निवडणूकांत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी केला आहे. गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने निकाल फिक्स केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हल्लाबोल केला आहे.

शनिवारी सर्व प्रमुख वृत्तपत्रात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या मतदान आणि निकालात मॅच फिक्सींग झाल्याचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यासह देशातच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर जेपी नड्डा यांचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकात मोठी मॅच फिस्कींग झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही पलटवार केला आहे.

चड्डा यांनी राहुल गांधी यांचा लेख निवडणूकांमागून निवडूका हरल्याने आलेले नैराश्य आणि हताशामुळे बोगस आख्यान रचण्याचा डाव आहे.

काय म्हणाले जे.पी. नड्डा?

जे.पी. नड्डा यांच्या पोस्टमध्ये नड्डा यांनी एकूण पाच मुद्यांना स्पर्श करीत आरोप लावलेला आहे. राहुल गांधी कसे दिशाभूल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे…

टप्पा 1: कांग्रेस पार्टी त्यांच्या वागणुकीमुळे निवडणूकांमागून निवडणूका हरत आहे.

टप्पा 2: आत्मनिरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र षड्यंत्र रचत आहे. आणि हेराफेरीचे षडयंत्र रचतात.

टप्पा 3: सर्व तथ्य आणि आंकड्यांना नजरअंदाज करतात.

टप्पा 4: शून्य पुराव्यासह संस्थांना बदनाम करतात असतात.

टप्पा 5: तथ्यांच्या ऐवजी बातम्यात राहाण्याची इच्छा व्यक्त करतात.

तसेच जेपी नड्डा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की वारंवार उघडकीस येऊनही ते निर्लज्जपणे खोटे पसरवत आहेत. आणि बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते असे करत आहेत. जे.पी. नड्डा पुढे म्हणाले की लोकशाहीला नाटकाची गरज नाही. त्याला सत्याची गरज आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.