AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा इफेक्टमुळं भाजपचं ओबीसी नेत्यांना ‘बळ’?

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, आणि छगन भुजबळ हे ओबीसी चेहरे. लोकसभेच्या निकालाचा दाखला घेत, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींना बळ देण्यास भाजपनं सुरुवात केलीये. त्याचाच एक भाग म्हणून, पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.

मराठा इफेक्टमुळं भाजपचं ओबीसी नेत्यांना 'बळ'?
| Updated on: Jun 21, 2024 | 10:45 PM
Share

ओबीसी नेत्यांसाठी भाजपनं खास रणनीती तयार केली आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या अशी विनंती फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं कळतंय. दुसरीकडे एकनाथ खडसेंनी अमित शाहांची भेट घेतली. तर भुजबळांचाही आरक्षणासंदर्भात ओबीसींच्या शिष्टमंडळात समावेश झाला. ओबीसींना बळ देण्यामागं काय स्ट्रॅटर्जी आहे जाणून घ्या.

एकनाथ खडसेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली म्हणजेच पुढच्या काही दिवसांत नाथाभाऊंचं भाजपच्या एंट्रीचं दार उघडलेलं असेल आणि ओबीसींच्या मागण्यासंदर्भात हाकेंच्या उपोषणानंतर जे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करतंय, त्यात पंकजा मुंडेंसह छगन भुजबळही आहेत. मेसेज क्लीअर आहे, ओबीसी नेत्यांना भाजप फ्रंट फूटवर आणतंय. आता ओबीसी नेत्यांना भाजपनं बळ देण्याच्या हालचाली का सुरु केल्यात तेही पाहुयात.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका मराठवाड्यात भाजप आणि महायुतीला बसला. लोकसभेच्या निकालानुसार 48 पैकी 26 मराठा खासदार तर 9 खासदार ओबीसी आहेत. 6 महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आहात, त्यासाठी ओबीसी मतदारांना मेसेज देण्यासाठी स्वत:चा DNA ओबीसी सांगणाऱ्या भाजपचा प्रयत्न ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा आहे.

मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र 10 % आरक्षण दिलंय. आता सगेसोयऱ्यांचा विषय निकाली काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारनं महिन्याभराचा वेळ घेतला. त्याचवेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं सरकार म्हणतेय. ओबीसींच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या ओबीसी नेत्यांचाही समावेश करण्यात आलाय.

आरक्षणाच्या विषयासह ओबीसी नेत्यांच्याही पाठीशी भाजप उभी आहे, हे कृतीतूनही दाखवणं सुरु आहे. त्यामुळं बीड लोकसभेतून पराभूत झाल्यावर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदारकी द्या, अशी विनंती फडणवीसांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे. तसं झाल्यास 2019पासून प्रतीक्षेत असलेल्या पंकजांचं राजकीय पुनर्वसन होईल.

लोकसभेच्या पराभवानंतर, पंकजा मुंडेंनीही मी हिरो व्हावं असं कोणाला कसं आवडेल ?, असं सांगत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

उदयनराजे आणि पियूष गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं राज्यसभेच्या महाराष्ट्रातून 2 जागा रिक्त झाल्यात..त्यामुळं पंकजा मुंडेंची एका जागेवर वर्णी लागू शकते.

दुसरीकडे भाजपपासून दूर गेलेले, एकनाथ खडसेंचाही लवकरच भाजपात प्रवेश होवू शकतो. नाथाभाऊंची सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार असून त्यांची मंत्रीपदीही वर्णी लागली. रक्षा खडसेंसोबतच एकनाथ खडसेंनी अमित शाहांची भेट घेतली.

महाराष्ट्र असो की देश…ओबीसी, भाजपची व्होट बँक आहे, हे कोणीही नाकारत नाही…मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन जो विषय महाराष्ट्रात तापलाय..त्यावरुन मराठा आरक्षणावरुन मार्ग काढण्यासह, ओबीसी नेत्यांनाही बळ देण्याचे प्रयत्न सुरु झालेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.