AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना एक चूक महागात पडली… नाही तर आज महापौर असता; काय घडलं असं?

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातून का गेली? कोणती एक चूक उद्धव ठाकरे यांना महागात पडली... असं घडलं तरी काय? निकाल घोषित झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण..

BMC Election 2026:  उद्धव ठाकरेंना एक चूक महागात पडली... नाही तर आज महापौर असता; काय घडलं असं?
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 17, 2026 | 1:01 PM
Share

BMC Election 2026: भाजपचा 25 वर्षांचा वनवास अखेर संपला आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकवला आहे. महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेने एकत्र लढली आणि मोठा वियज प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर उद्धव ठाकरे फेल ठरलेत… महायुतीने बीएमसीमध्ये बहूमत मिळवलं आहे. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत. त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरला आहे. कारण भाजपने सर्वांत श्रीमंत महानगरपालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे…

उद्धव ठाकरे यांच्या गटाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलं. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 84 उमेदवार निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर एकत्र आले. पण त्याचा देखील काही फायदा झाला नाही… कारण मनसेचा फक्त सहा जागांवर विजय झाला.

Live

Municipal Election 2026

01:04 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : अजित पवार यांनी थेट केले युतीबद्दल मोठे विधान..

12:29 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : शर्मिला ठाकरे यांचा पराभवानंतर मोठा खुलासा...

12:39 PM

Mumbai Election Result 2026 : लोकांनी डोळे उघडले पाहिजेत - शर्मिला ठाकरे

12:34 PM

Mumbai Election Result 2026 : मुंबईत फक्त 6 नगरसेवक आले, तरी शर्मिला ठाकरे का म्हणाल्या मला अभिमान आहे?

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

अशाप्रकारे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फक्त 71 जागांवर विजय मिळवता आला. पण, उद्धव ठाकरे यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात वेगळं दिसलं असतं. त्यांनी विधानसभा निवडणुकीसारखीच रणनीती अवलंबली असती तर आजचं चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं.

उद्धव ठाकरे यांची एक चूक…

आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणची चूक झाली, ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून गेली… जर उद्धव ठाकरेंनी ती चूक केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असते. सध्याच्या निकालांकडे पाहता असं दिसतं की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षाने देखील चूक केली आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर निकाल काहीसा वेगळा आणि समाधानकारक असता. काँग्रेसने निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि 24 जागांवर विजय मिळवला. जर उद्धव ठाकरे काँग्रेसला पटवून देण्यात आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र करण्यात यशस्वी झाले असते, तर कदाचित बीएमसीमध्ये मतांचे विभाजन कमी झालं असतं आणि जास्त जागा जिंकता आल्या असत्या.

पराभवाचा परिणाम काय होईल?

बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली… हा फार मोठा धक्का आहे. कारण मुंबई महानगरपालिका शिवसेनेची खरी ताकद आहे… गेल्या 25 वर्षांपासून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे मुंबईवर वर्चस्व होतं. अशात निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्णय घेत पाऊल ठेवायला हवीत… उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत चर्चा करतील की मनसेसोबत राहतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट
महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट.
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी
महिलेलाच महापौर करा... शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी.
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा
महापालिका निकालानंतर संजय राऊतांचा विरोधकांना थेट इशारा.
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?
आधी मागे पडले, नंतर अचानक... कोण ठरलं खरा ठाणेदार?.
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय
25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा; महायुतीचा ऐतिहासिक विजय.
25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली
25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली.
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.