Maharashtra Election News LIVE : भारतीय जनता पार्टी म्हणजे वॉशिंग मशीन – सपकाळ

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: राज्यातील २९ महापालिकांच्या प्रचारासाठी आजचा सुपर संडे गाजणार आहे. मुंबईत ठाकरे बंधूंचा ऐतिहासिक संयुक्त वचननामा, अमरावतीत देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आणि सोलापूरमध्ये अमित ठाकरेंचा दौरा; वाचा सर्व लाईव्ह अपडेट्स.

Maharashtra Election News LIVE : भारतीय जनता पार्टी म्हणजे वॉशिंग मशीन – सपकाळ
breaking
| Edited By: | Updated on: Jan 05, 2026 | 8:47 AM

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आजचा सुपर संडे राजकीय घडामोडींनी गाजणार आहे. मुंबईत १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत. शिवसेना भवनातून महाविकास आघाडीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे. तर दुसरीकडे, विदर्भात ताकद दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत भव्य रोड शो करणार आहेत. तर नाशिकमध्ये रवींद्र चव्हाणांच्या सभेने भाजपच्या प्रचाराचा शंखनाद होईल. सोलापूरमध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आज पीडित कुटुंबाचे सांत्वन करणार असल्याने तेथे तणावपूर्ण शांतता आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजकीय वातावरण आज शिगेला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपले शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jan 2026 07:55 PM (IST)

    बुलढाणा : चार वर्षानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ दाखल

    सुमारे चार वर्षांपूर्वी बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवासास असलेला T1C1 हा वाघ या अभयारण्यातून अचानक गायब झाला होता , मात्र त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाच अस्तित्व नसल्याने आज वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक 36 महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आणला आहे.

  • 04 Jan 2026 07:40 PM (IST)

    शिवसेना एकच आहे ती आपलीच आहे – आदित्य ठाकरे

    आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वार्ड क्रमांक 101 मधील उमेदवार अक्षता टंडन यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेना एकच आहे ती आपलीच आहे. आपली शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस ती पण एकच आहे पवार साहेबांची असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

  • 04 Jan 2026 07:26 PM (IST)

    जळगाव : रवींद्र पाटील यांनी फोडला प्रचाराचा नारळ

    जळगावात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. जळगावातील पिंप्राळा येथील भवानी मंदिरात रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ झाला आहे. यावेळी भाजप खासदार स्मिता वाघ यांच्यासह शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हेही उपस्थित होते.

  • 04 Jan 2026 07:12 PM (IST)

    भारतीय जनता पार्टी म्हणजे वॉशिंग मशीन – सपकाळ

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, काँग्रेस सोडून गेलेले नेते सत्तेसाठी आसुसलेले आहेत. भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन आहे. त्या वॉशिंग मशीन मध्ये कुठलाही अट्टल चोर, गुन्हेगार, भ्रष्ट माणूस टाकला की तो एकदम नैतिक आणि खूप ज्ञानी होऊन निघतो, म्हणून हा सत्तेला आलेला अहंकार आहे. मात्र जो सूर्य उगवतो तो मावळत असतो, भाजपाच्या हा सत्तेच्या माज जास्त काळ टिकणार नाही.

  • 04 Jan 2026 06:46 PM (IST)

    लाडक्या बहिणींच्या पाठींब्याने सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील – मंत्री दादा भुसे

    नाशिक – हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. लाडक्या बहिणींचा पाठिंबा जसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला तेवढाच या उमेदवारांना मिळणार असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

     

  • 04 Jan 2026 06:35 PM (IST)

    आम्ही सर्व वचन पूर्ण केली आहेत – आदित्य ठाकरे

    देशात तुमचे सरकार आहे राज्यात बारा वर्षे तुमच्या हातात सरकार आहे आमचा पूर्वीचा वचननामा पाहून बघा, आम्ही सर्व वचन पूर्ण केली आहेत, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

  • 04 Jan 2026 06:27 PM (IST)

    बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ दाखल, पर्यटकांत आनंद

    तब्बल चार वर्षानंतर बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ दाखल झाल्याने आनंद व्यक्त होत  आहे.  पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला आहे. हा वाघ दाखल झाल्याने पर्यटकांत आनंदाचे वातावरण आहे.

  • 04 Jan 2026 06:01 PM (IST)

    महायुती अकोल्यात 60 प्लस टार्गेट पूर्ण करेल : देवेंद्र फडणवीस

    महायुती अकोल्यात 60 प्लस टार्गेट पूर्ण करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अकोल्यातील प्रचारसभेत फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

  • 04 Jan 2026 05:49 PM (IST)

    बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल चार वर्षानंतर वाघ दाखल

    बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात तब्बल चार वर्षानंतर वाघ दाखल झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वय असलेल्या वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला आहे. वाघ दाखल झाल्याने पर्यटकांत आनंदाचे वातावरण आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवासास असलेला T1C1 हा वाघ या अभयारण्यातून अचानक गायब झाला होता. त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाच अस्तित्व नसल्याने आज वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक 36 महिने वयाचा वाघ बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आणला आहे.

  • 04 Jan 2026 05:26 PM (IST)

    जमीन लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? पुण्यात दादांना प्रश्न विचारणारे बॅनर व्हायरल

    पुण्यात अजित पवार यांना प्रश्न विचारणारे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची चर्चा पाहायला मिळत आहे. “हाच का दादाचा वादा??? अजित दादा जमीन लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का?”, हाच का दादाचा वादा??? दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, अशा आशयाचे बॅनर्स प्रभाग क्रमांक 9 मध्ये लावण्यात आले आहेत.

  • 04 Jan 2026 05:15 PM (IST)

    मनसे-ठाकरे सेनेचा वचननामा म्हणजे लबाडा घरचे जेवण : आशिष शेलार

    ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावरुन भाजपच्या आशिष शेलार यांनी टीका केली आहे. हा वचननामा नाही, तर अपचनामा आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

    “दोन्ही पक्षांचा मनसे आणि उबाठा सेनेचा हा वचननामा म्हणजे लबाडा घरचे जेवण आहे.लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयाला विरोध केला. न्यायालयापर्यंत जाऊन विरोध केला काँग्रेसने पण केलं. आता हे दीड हजार रुपये देणार सांगतात म्हणून त्यांच्या म्हणण्यावर कोणाचा विश्वास नाही”, असंही शेलार म्हणाले.

  • 04 Jan 2026 04:50 PM (IST)

    धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग, ‘स्ट्रॉंग रूम’ची प्रशासनाकडून पाहणी

     धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला आता चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, मतदानासाठीची यंत्रे (ईव्हीएम) सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘स्ट्रॉंग रूम’ची आज  प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने या जागेची तांत्रिक आणि सुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली.
  • 04 Jan 2026 04:39 PM (IST)

    भाजपकडून पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील चार उमेदवारांना उमेदवारी

    मालेगावात भाजपने पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील चार उमेदवारांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की केंद्र व राज्यातील एनडीए सरकारच्या योजना सर्व नागरिकांसाठी असून त्या कोणत्याही जात-धर्मावर आधारित नाहीत. भाजपमध्ये सर्व समाजाचे उमेदवार असून जिथे इच्छुक व सक्षम उमेदवार आहेत, त्यांना सोबत घेऊन जाण्याचे पक्षाचे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • 04 Jan 2026 04:15 PM (IST)

    पुण्याच्या मंचर येथे बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन

    पुण्याच्या मंचर येथे मोरडे फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया ओपन फाईड रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. एकाच दिवशी होणाऱ्या या रॅपिड स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 300 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

  • 04 Jan 2026 03:56 PM (IST)

    धुळ्यात आज भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार

    धुळे महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण धुळ्यात दाखल

    श्री आई एकविरा मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी चव्हाण दाखल

    भाजपाचे सर्व प्रमुख नेते तसेच भाजप उमेदवार उपस्थित

    रवींद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेवर टीका करतात का? याकडे सर्वांचे लक्ष

  • 04 Jan 2026 03:48 PM (IST)

    भाजपकडून 22 जणांचं निलंबन, पक्षशिस्त मोडल्याचा ठपका

    भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 जणांंच निलंबन करण्यात आलं आहे. पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत, त्यांचं निलंबन करण्यात आलं.  ज्या इच्छुकांना पक्षातर्फे महापालिका निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यामुळे ज्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांचं पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे.

  • 04 Jan 2026 03:33 PM (IST)

    बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची भेट घ्या, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आवाहन

    एक दिवस प्रचार सोडून बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची भेट घ्या

    मनसे नेते अमित ठाकरेंचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आवाहन

    हत्या झालेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांचं आवाहन

    ‘जर आशा पद्धतीने निवडणुका जिंकायच्या असतील तर आम्हाला निवडणूक नको, आम्ही माघार घेतो’

    अमित ठाकरे भेटीनंतर भावुक

     

  • 04 Jan 2026 03:15 PM (IST)

    ऑल इंडिया ओपन फाईड रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

    पुण्याच्या मंचर येथे मोरडे फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया ओपन फाईड रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. एकाच दिवशी होणाऱ्या या रॅपिड स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 300 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

  • 04 Jan 2026 02:30 PM (IST)

    नाशिकमध्ये भीषण अपघातात, दोन ठार, सीसीटीव्हीत अपघाताचा थरार कैद

    नाशिकच्या त्र्यंबक रोडवर दगडाने भरलेल्या टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दगडाने भरलेला टिप्पर उलटून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे दोन्ही तरुण बुलढाणा जिल्ह्यातील असून पर्यटनासाठी नाशिकला आले होते, असं सांगण्यात येतं.

  • 04 Jan 2026 02:26 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीत भव्य रोड शो…

    अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून ते साईनगर पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य अशा रोड शोला सुरवात. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत भाजपाचा जोरदार शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच चौकाचौकात केलं जंगी स्वागत.अमरावतीच्या साईनगरात मुख्यमंत्र्यांचा रोड शोचा समारोप होणार आहे. साईनगर मुख्यमंत्री अमरावतीकरांशी संवाद साधणार आहेत. पंचवटी चौक, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्थंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलंगण रोड, नवीन बियाणी चौक, आणि साईनगर, साई मंदिर असा मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू.

  • 04 Jan 2026 02:03 PM (IST)

    बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची अमित ठाकरेंनी घेतली भेट

    मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांची हत्या झाली. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनी सोलापूरमध्ये जाऊन सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले आहे.

  • 04 Jan 2026 01:38 PM (IST)

    महाराष्ट्रात प्रत्येक महापौर हा मराठीच होणार- राज ठाकरे

    पेशवाईंच्या काळात तीन संस्थांन होती. गुजरातमध्ये गायकवाड, शिंदे आणि होळकरांचं. बडोद्याचं साम्राज्य मराठेशाहीचं होतं. तिथे सर्व मेहेर गुजराती का होतात? महाराष्ट्रात प्रत्येक महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करता. आम्ही हिंदू आहोत. हिंदी नाही आहोत. मराठीचा मान राखलाच पाहिजे. आमचाच महापौर हा मराठीचाच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार असे राज ठाकरे म्हणाले.

  • 04 Jan 2026 01:35 PM (IST)

    निवडणूक आयोगाने दम असेल तर निवडणूक रद्द करावी- उद्धव ठाकरे

    कोर्टात जाऊन काय होणार आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर. निवडणूक आयोगाने दम असेल तर त्यांनी निवडणूक रद्द करावी. आरओ होते त्यांचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज सारखं डीलिट केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

  • 04 Jan 2026 01:30 PM (IST)

    राहुल नार्वेकरांना निलंबित करा; उद्धव ठाकरे यांची मागणी

    राहुल नार्वेकरांना निलंबित करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तसेच बिनविरोध झालेल्या निवडणुका रद्द केला. काल वरळीत डोममध्ये डोमकावळे जमले होते. तिथे शिवसैनिकच होते. मुंबईचा महापौर मराठीच होणार. भाजप आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर कुणाला केले होते हे पाहावे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 04 Jan 2026 01:23 PM (IST)

    निवडणूक आयोगाचं नाटक आहे, त्यांनी निकाल राखून ठेवला- उद्धव ठाकरे

    निवडणूक आयोगाचं नाटक आहे. त्यांनी निकाल राखून ठेवला. पुन्हा निकाल तोच जाहीर करतील. जेनझीचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. केवळ निवडणूक निकाल रोखू नका. तुम्ही तिथल्या निवडणुका रद्द करा. नाही तर तुम्ही गुलाम आहात हे लोकांमध्ये जाईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

  • 04 Jan 2026 01:16 PM (IST)

    मला जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय- राज ठाकरे

    माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार २० वर्षानंतर आले असा उल्लेख केला. मला वाटतं जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं. खूप वर्षाने सेनाभवनात आलो. नवीन सेना भवन पहिल्यांदाच बघतो. कायमच्या आठवणी या जुन्या शिवसेना भवनाच्या आहेत. आता कुठे काय होतंय समजत नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षांनी शिवसेना भवनात गेल्यानंतर म्हटले.

  • 04 Jan 2026 01:00 PM (IST)

    तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात

    तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा जाहीर होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

  • 04 Jan 2026 12:51 PM (IST)

    उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

    उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेत वजननामा जाहीर करणार आहेत. ठाकरे बंधू मुंबईसाठीचा वचननामा जाहीर करणार आहेत.

  • 04 Jan 2026 12:40 PM (IST)

    दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार

    काही वेळापूर्वी संजय राऊतांनी ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंशी चर्चा केली. तर उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वरून रवाना झाले आहेत. दुपारी 1 वाजता ठाकरे बंधुंचा संयुक्त वचननामा जाहीर होणार आहे.

  • 04 Jan 2026 12:30 PM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर

    सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. मृत शिक्षकाला महानगरपालिकेच्या निवडणूक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ९ महिन्यापुर्वीच माढा तालुक्यातील भुताष्टे गावातील शिक्षक बाळासाहेब पाटील यांचं निधन झालं होतं. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ओम्बासे यांच्या सहीचे नियुक्ती आदेशाचे पत्र काढून निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सूचित केलं आहे.

  • 04 Jan 2026 12:20 PM (IST)

    मुंबईतील वांद्र्यामध्ये आशिष शेलारांकडून प्रचार

    मुंबईतील वांद्र्यामध्ये आशिष शेलारांकडून प्रचार करण्यात येत आहे. श्रेय लुटणाऱ्या टोळीचे म्होरक्या उद्धव ठाकरे आहेत, अशी टीका शेलारांनी यावेळी केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे.

  • 04 Jan 2026 12:10 PM (IST)

    महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात फडणवीसांचा रोड शो

    महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे नेते या रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत. चंद्रपुरात फडणवीसांनी माता महाकालीचंही दर्शन घेतलं.

  • 04 Jan 2026 11:59 AM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंवर टीका

    ठाकरेंनी कितीही जाहीरनामा देऊन तोंडाच्या वाफा फेकल्या किंवा जहरी टीका केली. तरी जनता त्यांना विचारणार नाही.त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना मतदानही करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्रासाठी जनता मतदान करणार आहे शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मतदान करतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या विकसित मुंबई करिता जनता मतदान करणार असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • 04 Jan 2026 11:50 AM (IST)

    सोलापुरात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन

    मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन करण्यात येत आहे. मनविसे प्रमुख अमित ठाकरे सरवदे कुटुंबाची सांत्वन करुन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली.मनविसे प्रमुख अमित ठाकरे देखील या मूक आंदोलनात सहभागी होणार आहे.काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच मनसेच्यावतीने हे मूक आंदोलन करण्यात येतेय

  • 04 Jan 2026 11:40 AM (IST)

    मावळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारकऱ्यांच्या सोबत पंगतीत जेवणाचा आस्वाद

    मावळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारकऱ्यांच्या सोबत पंगतीत जेवणाचा आस्वाद घेतला. मावळ तालुक्यात सध्या भक्ती, संस्कृती आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळत असून श्री विठ्ठल परिवार,मावळ आयोजित कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या पावन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावत विठ्ठलनामाचा गजर अनुभवला. यावेळी मावळ आमदार सुनील शेळके यांच्या कुटुंबियांसह; पारंपरिक भारतीय बैठकीत भोजनाचा आनंद घेत भक्तीचा भाव अधिक दृढ झाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित वारकरी संप्रदायामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

  • 04 Jan 2026 11:30 AM (IST)

    चंद्रपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचाराचा नारळ फोडला

    चंद्रपूर शहर मनपाच्या भाजप प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात दाखल झाले आहेत. देवी महाकाली मंदिरात भाजप लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ते देवीचे दर्शन, आरती करतील. त्यानंतर शहरात त्यांचा रोड शो होईल.

  • 04 Jan 2026 11:20 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज अमरावती शहरात रोड शो

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर; महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ फडणवीसांचा आज अमरावती शहरात रोड शो होत आहे.अमरावतीच्या पंचवटी चौक ते साईनगर पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होईल.फडणवीसांच्या रोडशोसाठी अमरावतीत आठशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.पंचवटी चौक ते साईनगर पर्यंत असा आठ किलोमीटर फडवणीसांचा रोड शो होईल.

  • 04 Jan 2026 11:10 AM (IST)

    अंबादास दानवे यांची सुक्रेंविरोधात कारवाईची मागणी

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला धमकवल्या प्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र दिले आहे.वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांच्यावर कारवाई न झाल्यास गाढवावरून धिंड काढू असा इशारा आंबादास दानवे यांनी दिला आहे

  • 04 Jan 2026 11:00 AM (IST)

    संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरे गटावर टीका

    महानगरपालिकेची होती का तुटली याची कारणे समोर आले आहेत.काही लोकांची मानसिकता आहेत, यांची अवस्था अशी झाली काही ठिकाणी यांना उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत.या शहरातली दादागिरी, गुंडगिरी, अतिक्रमण जीरवण्यासाठी प्रयत्न करू.रशीद मामू जिंदाबाद म्हणत आहे, उबाठा मामू अभिमानाने सांगत आहेत बारा उमेदवार उभे केले. जेव्हा ते घरात घुसतील तेव्हा कळेल ते बाराचेच आहेत मग यांना कळेल, अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटावर केली.

  • 04 Jan 2026 10:50 AM (IST)

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज जळगावच्या दौऱ्यावर

    महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावातील पिंप्राळ्यात सभा. पिंप्राळ्यातील भवानी मंदिरापासून महायुतीच्या 19 प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

  • 04 Jan 2026 10:40 AM (IST)

    नांदेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

    नांदेड – भोकर रस्त्यावरील भोशी गावाजवळ घटना. वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन केला पंचनामा. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

  • 04 Jan 2026 10:30 AM (IST)

    मूळच्या नागपूरकर असलेल्या निलंबरी जगदाळे यांची पंजाबच्या पोलीस महानिरीक्षकपदी वर्णी

    – 2008 मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू झालेल्या निलंबरी ने पंजाब केडर निवडले होते. फरीदकोट परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदावर वर्णी लागलेल्या नीलांबरी यांच्याकडे सध्या पाकिस्तानच्या अस्वस्थ शेजार लाभलेल्या गुप्तचर विभागाचा अतिरिक्त पदभार देखील आहे.

  • 04 Jan 2026 10:20 AM (IST)

    आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यरात्री केली शहर स्वच्छतेची पाहणी

    सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एका नवीन खाजगी कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका दिल्यानंतर कामाच्या गुणवत्तेची केली पाहणी. सोलापूर शहरातील महत्त्वाचे रस्ते चकाचक ठेवण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून सूचना. सोलापूर शहरात धूळ आणि अस्वच्छतेसंबंधी तक्रारी वाढल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या सूचना

  • 04 Jan 2026 10:13 AM (IST)

    60 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेचे राज्य आहे- संजय राऊत

    नुकताच महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, 60 वर्षांपासून मुंबईत शिवसेनेचे राज्य आहे.

  • 04 Jan 2026 10:05 AM (IST)

    चंद्रकांत खैरे, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवेंसह 48 जणांची निर्दोष सुटका

    चौदा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नेत्यांना दिलासा. ठोस पुरावा मिळाला नसल्याने निर्दोष सुटका आंतरजातीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर हल्ला केल्याचा होता आरोप

  • 04 Jan 2026 09:59 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग, अंबादास दानवेंकडून आंदोलनाचा इशारा

    महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना डॉ. सुक्रे यांनी फोन करून ‘पालकमंत्र्यांच्या नादी कशाला लागतोस, उमेदवारी मागे घे’ अशी धमकी दिल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा थेट भंग असल्याचे सांगत दानवे यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून तातडीने चौकशीची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर कडक कारवाई न केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

  • 04 Jan 2026 09:54 AM (IST)

    नागपूर महापालिका रणधुमाळी, चिन्हांचे वाटप पूर्ण, प्रचाराच्या पहिल्या रविवारी अपक्षांचा सोशल मीडियावर धमाका

    नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आता खऱ्या अर्थाने रंगत भरली आहे. प्रचाराचा पहिला रविवार राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अक्षरशः गाजवला. राजकीय पक्षांनी आधीच सभा आणि पदयात्रांचा धडाका लावला असताना, शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनाही मोठे बळ मिळाले आहे. ३८ प्रभागांतील १५१ जागांसाठी रिंगणात असलेल्या तब्बल ९९२ उमेदवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, चिन्हांची खात्री पटताच अपक्षांनी सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सुटीचा दिवस साधत सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटी आणि डिजिटल प्रचारावर भर दिल्याने नागपूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • 04 Jan 2026 09:44 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणुकीत मतदार याद्यांच्या विलंबावरून काँग्रेस आक्रमक, प्रशासनावर गंभीर आरोप

    नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत आता मतदार याद्यांच्या घोळावरून राजकीय वातावरण तापले आहे. बुथनिहाय सचित्र मतदार याद्या वेळेत उपलब्ध न झाल्याने उमेदवारांचे प्रचार नियोजन कोलमडले आहे. या विलंबामागे सत्ताधारी भाजपला फायदा पोहोचवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी केला आहे. वास्तविक, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत याद्या मिळणे अपेक्षित असताना, यंदा निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोफत मिळणे अपेक्षित असलेल्या याद्यांसाठी प्रतिपृष्ठ २ रुपये आकारले जात असून, एका प्रभागासाठी उमेदवारांना ८ ते १० हजार रुपयांचा विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पैसे भरूनही याद्या मिळत नसल्याने निवडणुकीच्या पारदर्शकतेवरच काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • 04 Jan 2026 09:36 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंची रॅली, रशीद मामूंच्या उमेदवारीवरून राजकीय वादंग

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पडेगाव परिसरात माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रचारार्थ ही रॅली निघणार आहे. रशीद मामू यांचा शिवसेना प्रवेश आणि त्यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली असून, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय चिखलफेकही सुरू झाली आहे. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आजची दानवेंची रॅली आणि त्यातील भाषण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 04 Jan 2026 09:26 AM (IST)

    नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची ९ जानेवारीला संयुक्त सभा; आदित्य-अमितचाही रोड शो

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेणारी ऐतिहासिक घडामोडी घडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहे. येत्या ९ जानेवारीला नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची संयुक्त सभा पार पडणार आहे. दोन्ही भावांच्या या मनोमिलनामुळे नाशिकचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सभेसोबतच युवा पिढीचे नेतृत्व करणारे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा शहरात भव्य रोड शो देखील होणार आहे. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, नाशिकच्या या ‘महायुती’चा धडाका विरोधकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.

  • 04 Jan 2026 09:18 AM (IST)

    नाशिक मनपा निवडणूक, भाजपचा स्वबळाचा एल्गार, प्रचाराचा नारळ फुटणार

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून आजपासून शहरात भाजपच्या प्रचाराचा धडाका सुरू होत आहे. भाजपने नाशिकमध्ये ‘स्वबळावर’ निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये भव्य जाहीर सभा पार पडणार असून, याच सोहळ्यात विविध प्रभागांतील प्रचार कार्यालयांचे उद्घाटनही केले जाणार आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. स्वबळाचा नारा देत भाजपने नाशिकच्या रणांगणात आपल्या विरोधकांना तगडे आव्हान देण्याची रणनीती आखली आहे.

  • 04 Jan 2026 09:14 AM (IST)

    अमरावतीत भाजपचे शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज भव्य रोड शो

    अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात भव्य ‘रोड शो’ करणार आहेत. हा रोड शो दुपारी १:३० वाजता पंचवटी चौक येथून सुरू होणार असून, तो साईनगर आणि साई मंदिर परिसरापर्यंत जाणार आहे. या भव्य रॅलीमध्ये शेगाव नाका चौक, नवीन कॉटन मार्केट, जयस्तंभ चौक, राजकमल चौक आणि गांधी चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असून, याद्वारे मुख्यमंत्री मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. या रोड शोमध्ये हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे अमरावतील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.

  • 04 Jan 2026 09:08 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणूक, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप; डिजिटल प्रचाराचा धडाका सुरू

    नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने लढत स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप पूर्ण झाल्यामुळे शहरात प्रचाराला मोठी गती आली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वीच सभा, दौरे आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली होती, मात्र आता चिन्ह मिळाल्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनीही मैदानात उडी घेतली आहे. चिन्ह मिळताच अनेक उमेदवारांनी सोशल मीडियावर आपल्या चिन्हासह पोस्ट शेअर करून मतदारांकडे पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ३८ प्रभागांतील १५१ जागांसाठी आता ९९२ उमेदवार नशीब आजमावत असून, अपक्ष उमेदवारांच्या सक्रियतेमुळे अनेक प्रभागांत बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.

  • 04 Jan 2026 09:02 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणूक: भाजपच्या गडावर बंडखोरीचे सावट, दिग्गजांसमोर आव्हान

    नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय रणांगण तापले असून, भारतीय जनता पक्षाच्या काही दिग्गज नेत्यांसमोर यंदा त्यांच्याच पक्षातील बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. प्रभाग १४ मध्ये भाजपच्या प्रगती पाटील यांच्या विरोधात सुनील अग्रवाल यांनी शड्डू ठोकला आहे, तर प्रभाग १८ मध्ये बंडू राऊत यांच्यासमोर धीरज चव्हाण यांचे तगडे आव्हान आहे. याशिवाय, प्रभाग १७ मध्ये माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांच्या विरोधात विनायक देहनकर यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यामुळे भाजप नेत्यांना केवळ विरोधी पक्षांशीच नव्हे, तर आपल्याच घरातील बंडखोरांशी दोन हात करत आपली जागा वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.