AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांची टीका आणि सुप्रिया सुळे यांचा असाही दिलदारपणा, म्हणाल्या आम्ही ‘लोकशाही’वाले आहोत त्यामुळे…

जो विरोधात बोलतो त्यावर केस होते असे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली तर यात मला काही आश्चर्य वाटणार नाही.

विरोधकांची टीका आणि सुप्रिया सुळे यांचा असाही दिलदारपणा, म्हणाल्या आम्ही 'लोकशाही'वाले आहोत त्यामुळे...
NCP SUPRIYA SULE Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 24, 2023 | 4:09 PM
Share

इंदापूर : राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर महाराष्ट्रात आणि देशात कारवाया होत आहेत. आतापर्यंत ज्या कारवाया किंवा आरोप झाले त्यातील 95 टक्के विरोधी पक्षांवरच झाल्यात. जो विरोधात बोलतो त्यावर केस होते असे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली तर यात मला काही आश्चर्य वाटणार नाही. आम्ही काही त्यांच्यासारखे दडपशाहीवाले नाही. तर लोकशाही मानणारे आम्ही लोकशाहीवाले आहोत, असा टोला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

इंदापूर येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंफोसिसच्या सहकार्यातून 800 संगणक आणि कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. आधुनिक काळात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी हा चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गरीब विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकतात. त्यांना घडवण्याचं काम शिक्षक करतात. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले. गुणवत्तेसाठी सर्वजण कष्ट घेताहेत असे त्या म्हणाल्या.

जोपर्यंत सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत विकास होत नाही. महिलांना पुरुषांसोबत स्थान मिळले पाहिजे. अनेक ठिकाणी एसपी बोलतात. एसपी म्हणजे शरद पवार नाही. एसपी म्हणजे सरपंच पती. कुठेही गेलं तर सरपंच पती बोलताना दिसतात. साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं. पण, मला पुरुषांसाठी लढावं लागायचं असे त्यांनी सांगितले.

अजितदादा यांना कोणतं पद मिळेल?

अजितदादा यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पक्षात पद द्या अशी मागणी केली अशी चर्चा माझ्या कानावर तरी अजूनही आलेली नाही. पण, एका वर्तमानपत्रात अशी बातमी आली. अजितदादा यांना कोणतं पद मिळेल याची मला माहिती नाही. परंतु, पक्षाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्या म्हणाल्या.

अतिथी देवो भव, बीआरएसचं स्वागत

बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंढपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्यांचे पंढरपूरमध्ये स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात पाहुण्यांचे स्वागत करण्याची पारंपरा आहे. अतिथी देवो भव असे आपण म्हणतो. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे.

शेजारी बसणे गुन्हा नाही

काल देशाच्या 15 प्रमुख विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि मुफ्ती मेहबूब हे दोघे नेते बाजूला बसले होते. यावरून भाजपने ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, भाजपाला बोलायला आता काहीच उरलेलं नाही. ते जेव्हा शेजारी बसले होते तेव्हा त्यांना चालत होतं. कुणी कुणाच्या शेजारी बसणं हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी केला.

आम्ही लोकशाहीवाले आहोत

पटना येथे झालेल्या बैठकीवर अमित शाह यांनीही टीका केली आहे. त्यावर आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टिका करु नये असे काही नाही. आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....