'कोरोना'मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील दोघांना लागण

'कोरोना'मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 60 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं (Buldana Corona Patients Rise)

'कोरोना'मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील दोघांना लागण

बुलडाणा : ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाच्या चिंतेत भर पडली आहे. कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. (Buldana Corona Patients Rise)

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या बुलडाण्यातील रुग्णाच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 60 जणांना काल विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 34 जणांचे नमुने चाचणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते.

20 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आले, उर्वरित व्यक्तींपैकी दोघा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुलडाणाकरांची डोकेदुखी वाढली आहे.

बुलडाण्यात ‘क्वारंटाईन’ दरम्यान मृत्यू झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

बुलडाण्यातील रुग्णालयात क्वारंटाईनमधील 45 वर्षीय रुग्णाचा 28 मार्चला मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. न्यूमोनिया झाल्याने 26 मार्चला तो एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

28 मार्चला त्याला सामान्य रुग्णालयातील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. यावेळी तो व्यक्ती क्वारंटाईन असल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे का याची माहिती समोर आली नव्हती.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 225 वर पोहोचला आहे. मुंबईत एक, पुण्यात दोन, तर बुलडाण्यात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात दहा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील सात, तर नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

(Buldana Corona Patients Rise)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *