बुलडाणा : ‘आता माझी सटकली’ असं म्हणत बुलडाण्यातील साखरखेर्डा पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. टाळेबंदीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवण्याचा इशारा ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिला आहे. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या राजकारण्यांचीही ठाणेदाराने खरडपट्टी काढली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Buldana Police slams Politicians supporting curfew rule breakers)