आधी धमकी, मग करुन दाखवलं; मुलगी नाही दिली म्हणून सासूलाच पळवलं

धुळ्यात मुलगी नाही दिली म्हणून चक्क मुलीच्या आईलाच पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. (buldhana mother in law son in law marriage)

आधी धमकी, मग करुन दाखवलं; मुलगी नाही दिली म्हणून सासूलाच पळवलं
धुळ्यात महिला आपल्या जावयासोेबत पळून गेली.

धुळे : मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईला पळवून नेण्याचा प्रकार आपण चित्रपटातत अनेकवेळा पाहिला असेल. मात्र, अशी घटना धुळ्यात जिल्ह्यात खरोखर घडली आहे. मुलगी दिली नाही म्हणून चक्क मुलीच्या आईलाच पळवल्याचा अजब प्रकार धुळ्यात घडलाय. मुलगी देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाने चक्क मुलीच्या आईलाच फुस लावून पळवलंय. विशेष म्हणजे, तरुणासोबत पळून गेलेल्या मुलीच्या आईने “मी आता तुमच्याकडे येणार नाही. आम्ही लग्न करत आहोत,” असं आपल्या पतीला फोनवरुन सांगितलंय. (Dhule mother in law gone with son in law will marry together)

मुलगी द्या नाहीतर मुलीच्या आईलाच पळवून नेतो

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी धुळ्यातील एक तरुण लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी गेला. यावेळी मुलीच्या आईवडिलांनी या तरुणाला मुलगी देण्यास नकार दिला. हा नकार न पचल्यामुळे या तरुणाने चाकूचा धाक दाखवत मुलीच्या आईलाच पळून नेईल अशी चक्क धमकी दिली. तरुणाची ही अजब पद्धत मुलीच्या घरच्यांना आवडली नाही. तरुणाचा हा आक्रस्ताळेपणा पाहून मुलीच्या घरच्यांनी लग्नास थेट नकार दिला.

मुलीच्या आईसोबत फोनवर गप्पा

या तरुणाने मुलीच्या आईशी फोनवर बोलणं सुरु केलं. नंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर एके दिवशी मुलीची आई घरातून गायब झाली. पळून गेलेल्या महिलेचा पती अचानक कामावरून घरी आल्यानंतर घरात आपली पत्नी दिसत नसल्याने थोटा घाबरला. आपल्या पत्नीची शोधाशोध करूनही ती सापडत नसल्याने तो हैराण झाला. शेवटी त्याने आपल्या पत्नीशी फोनवरुन संपर्क केल्यानंतर मुलगी न दिलेल्या तरुणानेच आपल्या बायकोला पळवल्याचे त्याच्या लक्षात आले. ही माहिती पळून गेलेल्या बायकोने स्वत:त तिच्या पतीला सांगितली.

आम्ही लग्न करणार आहोत

यावेळी पळून गेलेल्या महिलेने परत येण्यास चक्क नकार दिल्याचे समजते. “मी आता तुमच्याकडे येणार नाही,” असे या महिलेने आपल्या पतीला फोनवर सांगितले आहे. एवढंच नाही, तर आम्ही लग्न करत आहोत, असेदेखील या महिलेने 25 वर्षे सोबत राहिलेल्या आपल्या पतीला फोनवरुन सांगितले.

पळून गेलेल्या महिलेला 5 आपत्य, 4 नातवंड

जिच्याशी आपण पंचवीस वर्षे संसार केला. जिला आपलं सर्वस्व मानलं; अशा 41 वर्षीय पत्नीने अर्ध्यातच मार्ग बदलल्यामुळे महिलेचा पतीच चांगलाच हादरला आहे. न होणाऱ्या जावया सोबतच आपली पत्नी संसार थाटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याची भावना महिलेच्या नवऱ्यामध्ये आहे. पळून गेलेल्या महिलेला 5 मुलमुली तसेच चार नातवंड आहेत.

दरम्यान, जिच्यासोबत आयुष्याची 25 वर्षे घातली तीच हात सोडून पळून गेल्यामुळे पुढे काय असा प्रश्न पळून गेलेल्या महिलेच्या पतीसमोर उभा ठाकला आहे.

इतर बातम्या :

दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण ‘तिने’ नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी

(Dhule mother in law gone with son in law will marry together)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI