Navneet Rana : राजकारण सोडेल, पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही, महायुतीचा बडा नेता कडाडला

Lok Sabha Election 2024 : विदर्भातच नाही तर राज्यात अमरावतीची मोठी चर्चा आहे. येथे भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यावरुन अनेक जण नाराज असल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ येत असतानाच महायुतीतील या नेत्याने नवनीत राणा यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

Navneet Rana : राजकारण सोडेल, पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नाही, महायुतीचा बडा नेता कडाडला
महायुतीतील बड्या नेत्याची नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 1:57 PM

Navaneeth Rana : अमरावती मतदार संघात लोकसभा निवडणूक 2024 अत्यंत चुरुशीची होणार आहे. भाजपने येथून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील अनेक जण नाराज झाले आहे. बच्चू कडू यांनी पहिल्यांदा दंड थोपाटले तर महायुतीमधील या नेत्याने पण नवनीत राणा यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अगदी जवळ आलेली असताना राणा यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे.

राजकारण सोडेल, प्रचाराला जाणार नाही

महायुतीतील नेते आणि माजी खासदार आनंदराळ अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजकारण सोडेने पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला. महायुतीसाठी वातावरण चांगले आहे. कोणी काहीही म्हणो महायुतीला 45 च्या वर जागा मिळतील पण 35 च्या वर मिळायला हरकत नाही. देशात 400 पार शक्यता कमी, पण 300 पार नक्की जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

राणा यांच्यावर जहरी टीका

  • आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी,काँग्रेस सोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते.
  • त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला. नवरा बायकोला बंटी बबली नाव दिली, ती विचारपूर्वक दिल्याचे ते म्हणाले. मी राजकारण सोडेल पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे ते म्हणाले. काही तत्व आहेत माझी, तडजोडी मध्ये काही गोष्टी महायुतीत इच्छेविरुद्ध स्वीकारल्या. महायुतीचे सरकार महत्वाचे आहे , सरकार आले पाहिजे, देशाचे हित महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. कागदपत्रांवरुन त्यांचे जातप्रमाणात बोगस असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.
Non Stop LIVE Update
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त.
लोकसभा-राज्यसभेत नणंद भावजया?दादा सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार
लोकसभा-राज्यसभेत नणंद भावजया?दादा सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार.
कोणी मिशा काढणार होतं तर कोणी संन्यास घेणार होत...राऊतांचा कुणाला टोला
कोणी मिशा काढणार होतं तर कोणी संन्यास घेणार होत...राऊतांचा कुणाला टोला.