बुलढाण्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात; 14 महिन्यात 17 कारवाया; वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांवर जास्त कारवाई

बु़लढाणाः शासकीय यंत्रनेतील सर्वच विभागात पारदर्शीपणे काम व्हावे, या साठी महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक (Anti corruption bureau) विभागाकडून कारवाई करण्यात येत असते आणि याच विभागामार्फत 2021 या आर्थिक वर्षामध्ये या विभागाने तब्बल 15 तर 2022 या दोन महिन्याच्या काळामध्ये 2 अशा एकूण 14 महिन्याच्या काळात 17 कारवाया (Action) करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लाचखोर कर्मचारी […]

बुलढाण्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात; 14 महिन्यात 17 कारवाया; वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांवर जास्त कारवाई
बुलढाणा जिल्ह्यात लाच लुचपत विभागाच्या 14 महिन्यात 17 कारवाया
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 9:14 AM

बु़लढाणाः शासकीय यंत्रनेतील सर्वच विभागात पारदर्शीपणे काम व्हावे, या साठी महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक (Anti corruption bureau) विभागाकडून कारवाई करण्यात येत असते आणि याच विभागामार्फत 2021 या आर्थिक वर्षामध्ये या विभागाने तब्बल 15 तर 2022 या दोन महिन्याच्या काळामध्ये 2 अशा एकूण 14 महिन्याच्या काळात 17 कारवाया (Action) करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लाचखोर कर्मचारी महसूल (Revenue) विभागात आढळले असून, यामध्ये सर्व विभागातील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभागातील एकूण 6 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी वर्ग तीनचे आहेत तर दुसरा क्रमांक हा जिल्हा परिषद विभागाचा येत असून या विभागातील 5 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग तीनचे व चारचे कर्मचारी तर वर्ग दोनच्या एक अधिकाऱ्याचा समावेश आहे.

सर्वाधिक कर्मचारी महसूल विभागाचे

लाच लुचपत विभागाच्या 14 महिन्यात 17 कारवाया करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत सर्वाधिक कर्मचारी हे महसूल विभागात आढळून आले आहेत. महसूल विभागाच्या या कर्माचाऱ्यांमुळे जनसामान्य नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे शासनाकडून पारदर्शी कारभाराची अपेक्षा टेवली जात असते तर दुसरीकडे महसूल विभागातील कर्मचारी लाचलुचपतीच्या कारवाईत सापडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

लाचखोरांचे प्रमाण कमी नाही

महसूल विभागातील वर्ग तीनचेच कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक जास्त कारवाया करण्यात आल्या आहेत. शासनालाही हाच विभाग महसूल गोळा करुन देतो मात्र बुलढाणा जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ही कारवाई झाली असली तरी लाचखोर कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या 

Anil Deshmukh: अनिल देशमुखांची संपत्ती परत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले; रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत

Nagpur Tourism | आदासा तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी, पर्यटकांसाठी ॲडव्हेंचर पार्कची सुविधा

Ram Navami 2022 : रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल, पाहा खास फोटो!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.