AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swabhimani Protest | स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञातांकडून बुलडाणा तहसीलदाराची जीप जाळण्याचा प्रयत्न

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. बुलडाण्यात तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आलाय. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे.

Swabhimani Protest | स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, अज्ञातांकडून बुलडाणा तहसीलदाराची जीप जाळण्याचा प्रयत्न
Buldhana Swabhimani Agitation
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 7:48 AM
Share

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. बुलडाण्यात तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदार यांची जीप जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञातांकडून करण्यात आलाय. त्यामुळे या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे.

रविकांत तुपकर यांचा अन्‍नत्याग सत्याग्रह

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरपासून सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने तीनच दिवसांत व्यापक रुप धारण केले आहे. रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्याने शेतकरी पेटून उठले आहेत. 19 नोव्हेंबरला दिवसभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांनी चक्का जाम केला. तर काल सायंकाळी बुलडाण्यात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.

अन्नत्याग मंडपासमोर स्वाभिमानीचे पादाधिकारी शेख रफीक यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर त्यानंतर कार्यकर्त्यांनी चिखली रोडवर रास्ता रोको केला. याठिकाणी रविकांत तुपकर स्वतः रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्ते अजून संतप्त झाले होते. यावेळी पोलिसांची जीप सुद्धा फोडण्यात आली.

हे प्रकरण शांत झाले ही नव्हते की तेवढ्यात रात्री 11 वाजेच्या सुमारास बुलडाणा तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने तहसील कार्यालयात काही कर्मचारी काम करत असतांना ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी जीपकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या घटने नंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सोयाबीन कापूस आंदोलन आता पेटले असल्याचे यावरुन दिसतेय.

काय आहेत मागण्या ?

कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू  नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाचा आज चौथा दिवस असून गावबंद आंदोलनाची घोषणा जरी केलेली असली तरी तुपकर त्यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या :

तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण; वाशिममध्ये वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.