Buldana: दुसरीकडे शेतकरी विजेअभावी हतबल, दुसरीकडे झेडपी हेडऑफिसात विजेचा अपव्यय

वीज नसल्यामुळे एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यलयामध्ये विजेचा अपव्यय होताना दिसत आहे. दुपारी मधली सुट्टी झाल्याने सर्व कर्मचारी घरी निघून जातात मात्र आपापल्या विभागातील सर्व फॅन, लाईट, बिनधास्त सुरू असतात.

Buldana: दुसरीकडे शेतकरी विजेअभावी हतबल, दुसरीकडे झेडपी हेडऑफिसात विजेचा अपव्यय
बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये विजेचा अपव्ययImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:17 PM

बुलढाणाः राज्यात विजेची टंचाई भासत असल्याने आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात आपात्कालीन भारनियमन (Load shading) सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) शहरी तसेच ग्रामीण परिसरातील काही भागात वरिष्ठांच्या आदेशावरून भारनियमन करणे सुरू झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेंडिंग सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यामुळे घरातील सर्व विद्युत (Electric) उपकरणे बंद झाली आहेत.

वीज नसल्यामुळे एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यलयामध्ये विजेचा अपव्यय होताना दिसत आहे. दुपारी मधली सुट्टी झाल्याने सर्व कर्मचारी घरी निघून जातात मात्र आपापल्या विभागातील सर्व फॅन, लाईट, बिनधास्त सुरू असतात. आजच नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, कोळसा अपुरा असल्याने राज्यात वीज संकट येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर दुसरीकडे विजेचा अपव्यय होताना दिसत आहे.

कर्मचाऱ्यांना सूचना

कर्मचाऱ्यांची ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी हे चुकीचे असून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील तसेच आणि आपापल्या कक्षातून बाहेर जाताना सर्व इलेक्ट्रिक दिवे बंद करुन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांबाबतीत पुन्हा असे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा दमही कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

वीज संकट टाळा

राज्यात सध्या वीज संकट आहे, त्यामुळे राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, राज्यावरील संकट टाळण्यासाठी गुजरात राज्याकडून वीज घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यावरील संकट टाळायचे असेल तर विजेचा वापर जपून करण्याची गरज असल्याचे मत वीज खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातही वीज जपून वापरा असे अधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

PF : पीएफसंदर्भात महत्वाची बातमी, टॅक्स रिटर्न फाईलिंगमध्ये होऊ शकतो उशिर, वाचा आणि पटकन करा हे काम

राज्यावर वीज कपातीचे संकट; दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा;नितीन राऊत यांच्याकडून स्पष्ट

Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.