AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?

बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. बंदी झुगारुन कोणी शर्यतीचे आयोजन केलेच तर सरकारकडून कडक कारवाई केली जाते. मात्र ही शर्यत खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच भरली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र...बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?
bullock-cart-race
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 7:04 PM
Share

पुणे : राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे अशा शर्यतींना न्यायालयाने बंदी घातली आहे. बंदी झुगारुन कोणी शर्यतीचे आयोजन केलेच तर सरकारकडून कडक कारवाई केली जाते. मात्र ही शर्यत खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच भरली असून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

शर्यतीमध्ये तरुणांची तुफान गर्दी 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. ही दोन्ही गावे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात येतात. बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण करुन या शर्यतीची सुरुवात झाली असून येथे बैलांच्या मालकासह तरुणांनी चांगलीच गर्दी केली. या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. तसेच येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. असे असूनदेखील मंचर आणि घोडेगाव पोलिसांनी या बैलगाडा शर्यतीकडे दुर्लक्ष केले आहे.

शर्यतीत कोरोना नियमांची पायमल्ली 

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी राज्यात कोरोना प्रतिंबधक नियम पाळण्याचे आवाहन सरकारकडून केले जातेय. नियम पाळले नाही तर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता आहे. असे असतानादेखील या बैलगाडा शर्यतीत नागरिक मोठ्या संख्येने अपस्थित होते. तसेच येथे कोरोना नियमांना पयदळी तुडवण्यात आले. या साऱ्या नियमांचे उल्लंघन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याच मतदारसंघात होत असल्यामुळे सरकार या बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

बैलगाडा शर्यतीवरून राजकारण

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन राजकारण तापलेले आहे. काहीही झालं तरी बैलगाडा शर्यत आयोजित करणारच अशी भूमिका काही नेते घेताना दिसतात. तसेच असा शर्यतींवरून बंदी उठवायला हवी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जाते. तर दुसरीकडे नियमांना डावलून तसेच कायद्याला पायदळी तुडवले तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशार राज्य सरकारकडून दिला जातो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्यांनी तर बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर मोठं रान पेटवलं होतं. असे असताना आता पुन्हा एकदा पुण्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांच्या मुलाला अटकेची भीती; कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?

(bullock cart race in pune Vadgaon Kashimbeg and Girawali village constituency of dilip walse patil people demands strict action)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.