
Mood Of Maharashtra : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुंख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच राज्य सरकारला महापुरासारख्या आपत्तीचाही सामना करावा लागला आहे. अशातच आता सी व्होटर्सने फडणवीस सरकारच्या एका वर्षाचा लेखाजोखा मांडणारा एक सर्व्हे केला आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले असून जनतेच्या मनात काय आहे हे समोर आले आहे. राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता? सर्वात आवडता नेता कोणता? अशा विविध प्रश्नांवर जनतेना आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्रासमोरील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता यावर राज्यातील जनतेने आपले मत व्यक्त केले आहे. यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी हे दोन सर्वात मोठे प्रश्न सरकारसमोर आहेत. 31.9 टक्के लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. 30.2 टक्के लोकांनी बेराजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर 10.5 टक्के लोकांनी वीज पाणी रस्ते हे मुद्दे महत्त्वाचे आहेत असं म्हटलं आहे. तर 1.9 टक्के लोकांनी हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हा मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
कायदा आणि सुव्यवस्था तसेच महिलांची सुरक्षा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचे 6.8 टक्के लोकांनी म्हटले आहे. 7.7 टक्के लोकांनी भ्रष्टाचार हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. 2.2 टक्के लोकांना CAA/NRC/NCPR हे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत. त्याचबरोबर 4.8 टक्के लोकांना महागाई हा महत्त्वाचा मुद्दा वाटत आहे. 2.8 टक्के लोकांना राज्याचा सर्वांगिण विकास आणि 2.4 टक्के लोकांना इतर मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत.
सी व्होटर्सने आपल्या सर्व्हेमध्ये नागरिकांना तुमच्या भागातील विकास कामांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकांनी सरकारच्या कामाचे वेगवेगळे वर्गीकरण केले आहे. 31.7 टक्के लोकांनी सरकारने चांगली विकास कामे केली असल्याचे म्हटले आहे. 28.7 टक्के लोकांनी विकासाबाबत सरकारची कामगिरी सरासरा असल्याचे म्हटले आहे. 28.5 टक्के लोकांनी सरकारची कामगिरी वाईट असल्याचे म्हटले आहे. तर 11 टक्के लोकांनी माहिती नाही असं म्हटलं आहे.