आमदार रवी राणांसह 18 शेतकऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल; राणांची रात्र तिवसा पोलीस ठाण्यात

आमदार रवी राणांसह 18 शेतकऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल; राणांची रात्र तिवसा पोलीस ठाण्यात

आमदार रवी राणा आणि 18 शेतकऱ्यांवर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळे रवी राणा यांच्यासह इतर 18 शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागणार आहे.

prajwal dhage

|

Nov 13, 2020 | 11:53 PM

अमरावती : आमदार रवी राणा आणि 18 शेतकऱ्यांवर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळे रवी राणा यांच्यासह इतर 18 शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागणार आहे. राणा यांनी गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराज समाधीस्थळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या आंदोलनला हिंसक वळण लागल्याने रवी राणांसह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर उशिराने  गुन्हा दाखल केला.

विविध मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 2 तास अडवून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या. नंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हे आंदोलन मोडून काढलं. यावेळी आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, रवी राणा तसेच कार्यकर्ते, शेतकऱ्यांना पोलिसांनी तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी रविवारी मुंबईत जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. त्यानंतरही मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट ठाकरेंचे निवासस्थान म्हणजेच मातोश्रीसमोर आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशार दिला आहे.

“हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मी अनेकदा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आता रविवारी आम्ही अमरावतीहून मुंबईला जाऊ. आमच्यासोबत काही शेतकरीही असतील. आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊ. जर त्यांनी स्वीकारलं तर ठीक, नाहीतर शेतकऱ्यांना घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करु,” असं नवनीत राणा म्हणाल्या. तसेच, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार, नवनीत राणांचा एल्गार

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें