AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरातील अजित पवारांच्या सभेला गर्दी, नियमांचे उल्लंघन; पोलिसांकडून गुन्हा दाखल

कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Pandharpur Ajit Pawar campaign)

पंढरपुरातील अजित पवारांच्या सभेला गर्दी, नियमांचे उल्लंघन; पोलिसांकडून गुन्हा दाखल
Ajit Pawar
| Updated on: Apr 09, 2021 | 10:48 AM
Share

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली होती. यामुळे कोरोना नियमांचा भंग झाला होता. याप्रकरणी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against Shrikant Shinde due to corona rules violation in Pandharpur Ajit Pawar campaign)

भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी सभा 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकी रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी काल (8 एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमाला फक्त 200 लोकांची परवानगी होती. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यातील अनेक जण मास्क न घालताच पाहायला मिळत  होते. यावेळी कोरोना निर्बंधांना हरताळ फासण्यात आला.

श्रीकांत शिंदेवर गुन्हा

अजित पवारांचा हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता. यामुळे त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 नुसार पंढरपूर शहर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण काळे राष्ट्रवादीत

अवघ्या दोन वर्षांतच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.

विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. मात्र 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते. (case registered against Shrikant Shinde due to corona rules violation in Pandharpur Ajit Pawar campaign)

संबंधित बातम्या : 

“अरे अजित, कल्याण कुठे आहे बघ, मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

भाजप नेते कल्याणरावांच्या घरी जाऊन बसले, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार

VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.