‘दारासमोर रांगोळी, घरावर आकाश कंदील आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती’, महाराष्ट्रात घरोघरी सावित्री उत्सव साजरा

भारतात महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी 'सावित्री उत्सव' साजरा करण्यात आला.

'दारासमोर रांगोळी, घरावर आकाश कंदील आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती', महाराष्ट्रात घरोघरी सावित्री उत्सव साजरा
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 1:58 AM

मुंबई : भारतात महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात घरोघरी ‘सावित्री उत्सव’ साजरा करण्यात आला. दारासमोर रांगोळी, दरवाज्याला फुलांचे तोरण, दारात आकाश कंदील, उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती आणि घरात गोडधोड करून हा उत्सव साजरा केला गेला. यात मंत्री, कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतलेला पाहायला मिळाला (Celebration of Savitri Utsav on Birth Anniversary of Savitribai Phule in Maharashtra).

राष्ट्र सेवा दलाकडून मागील 8 वर्षांपासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस नव्या वर्षातला पहिला सण म्हणून साजरा केला जातो. याला सावित्री उत्सव असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, संघटना हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करतात. हा दिवस समाज सुधारक यांच्या जयंती पुरता मर्यादित न राहता त्याला सण म्हणून उत्सव म्हणून स्वरूप आलं आहे.

सावित्रीबाईंनी शेणा दगडांचा मारा झेलला म्हणून सर्वांची वाट प्रशस्त

शेणा दगडांचा मारा झेलत सावित्री बाई खडतर वाट चालत राहिल्या म्हणूनच आपली साऱ्यांची वाट प्रशस्त झाली ही भावना आज वाढीस लागली आहे, असं मत मुंबई राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि सावित्री उत्सवाचे समन्वयक शरद कदम यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे यंदा महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील त्यांच्या विभागाच्या वतीने हा सावित्री उत्सव साजरा करण्याचं आश्वासन दिलं होतं.

सावित्री उत्सवाचे वैशिष्ट्ये

या उत्सवाचे वैशिष्ट म्हणजे हा उत्सव स्वतःच्या घरापासून सुरू झाला आणि शहरातल्या एका ठिकाणी त्याचा समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात ‘सावित्रीच्या लेकी’ हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुलींना देण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी असे पुरस्कार सोहळे संपन्न झाले. या सर्व उपक्रमात तरुण मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.

आतापर्यंत या सावित्री उत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, मुक्ता दाभोलकर, सिरत सातपुते आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कपाळावर सावित्री बाईंप्रमाणे आडवी चिरी लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तसेच इतरांनाही चिरी लावण्याचे आवाहन केलं. त्याला महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला.

‘सावित्री आता घरोघरी,जोतिबाचा शोध जारी’

यंदा ‘सावित्री आता घरोघरी, जोतिबाचा शोध जारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यात सामान्य स्त्रियांपासून तर अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनी सावित्रीबाईंप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या ज्योतिबांविषयी (पुरुष सहकारी) विविध माध्यमातून आपले अनुभव व्यक्त केले. यात त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या पुरुषाचा मग तो नवरा, वडील, मुलगा, मित्र किंवा सहकारी असो यांची माहिती दिली. त्यांनी विवेकी नाते जपत, संवादी वातावरण राखत, दोघांच्याही फुलण्यासाठी अवकाश निर्माण केल्याची माहिती दिली.

एखाद्या प्रसंगी केलेली मोलाची मदत, आपल्या मतासाठी, स्वातंत्र्यासाठी घेतलेली भूमिका, पुढे जाण्यासाठी केलेली निरपेक्ष मदत आणि सर्वांच्याच आनंदी जगण्याला साथ दिली आहे अशा पुरुषांबद्द्ल या उपक्रमात अनेक अनुभव शेअर करण्यात आले. यातील अनेक स्त्रिया UPSC चा अभ्यास करत आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, काही पत्रकार आहेत आणि अनेक जणी उच्च शिक्षित असून परदेशात नोकरी करताहेत.

या उपक्रमामुळे इतर लोकांनाही आपल्या आजूबाजूला अनुकरणीय वाटेल असे अनेक जोतिबा असल्याची जाणीव होईल. त्यामुळे आनंदी समाजाच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल पुढे पडेल आणि सावित्री उत्सवाच्या निमित्ताने याची सुरुवात होईल, अशी भावन शरद कदम यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Special story | आजच्या भाषेत सावित्रीबाई फुले याच पहिल्या ‘प्लेग योद्धा’: हरी नरके

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी : उद्धव ठाकरे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शाहीर सचिन माळी, शितल साठेंचं अभिवादन

Celebration of Savitri Utsav on Birth Anniversary of Savitribai Phule in Maharashtra

Non Stop LIVE Update
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.