Chandoli National Park : चांदोली अभयारण्यात वणवा, वन्यजीव विभागाकडे आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली (Chandoli) बुद्रुक येथील जानाईवाडी (Janaiwadi) नजीक असलेल्या डोंगरास आग लागली. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे.

Chandoli National Park : चांदोली अभयारण्यात वणवा, वन्यजीव विभागाकडे आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही
चांदोली अभयारण्यात वणवाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 7:12 AM

सांगली – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चांदोली (Chandoli) बुद्रुक येथील जानाईवाडी (Janaiwadi) नजीक असलेल्या डोंगरास आग लागली. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग भयाण असल्यामुळे तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangali District) शिराळा तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येतो.

काही विग्नसंतोषी लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत

काही विग्नसंतोषी लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत. या डोंगररांगामध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारची झाडं आहेत. तसेच करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे देखील आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगामध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक झाले आहेत. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाही

आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाही. अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वन्यजीव कार्यालयातील अधिकाऱ्यांची मुजोरी व या परिसरातल्या विविध समस्या यामुळे स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये मतभेद आहेत. भयाण आग लागलेली असताना देखील विझविण्यासाठी कोणीही ग्रामस्थ पुढे येत नसल्याचे चित्र होते.

Solapur विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा; सिनेट सदस्यांचे राज्यपालांना निवेदन

Aurangabad | औरंगाबाद जिल्ह्यात हर घर नल योजनेला गती, 537 गावांत नळ योजनांना मंजुरी, कसे मिळणार पाणी?

01 April 2022 Panchang : 01 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.