Maharashtra News Live Update : पाच राज्याच्या निकाला नंतर त्यांचा उन्माद वाढला आणि निवडणूक लादली : सतेज पाटील

| Updated on: Apr 01, 2022 | 11:14 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पाच राज्याच्या निकाला नंतर त्यांचा उन्माद वाढला आणि निवडणूक लादली : सतेज पाटील
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज शुक्रवार 1 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यापीठ विकास मंचचे सदस्य आणि सिनेट सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केलीय. त्याचबरोबर कुलगुरू फडणवीस यांनी नियमबाह्यपणे टेंडर दिल्याने त्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना दिले

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2022 08:57 PM (IST)

    पालकमंत्री म्हणून काम केलं असत तर चंद्रकांत दादांना पुण्याला पळून जावं लागलं नसत : सतेज पाटील

    महाविकास आघाडी अभेद्य आहे हे दाखवून देण्याची वेळ आलीय

    निवडणूक बिनविरोध करायला भाजप चा सुरवातीला प्रतिसाद होता

    मात्र पाच राज्याच्या निकाला नंतर त्यांचा उन्माद वाढला आणि निवडणूक लादली गेली

    आज काँग्रेस न 50 वर्षात काय केलं हा प्रश्न केला जातोय

    पालकमंत्री म्हणून काम केलं असत तर चंद्रकांत दादांना पुण्याला पळून जावं लागलं नसत

  • 01 Apr 2022 07:28 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावरुन निघाले

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावरुन निघाले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा

    सोमय्या पिता-पुत्रांवरील कारवाईसाठी संजय राऊत आग्रही

    दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांच्यात स्वतंत्र बैठक होणार

  • 01 Apr 2022 06:13 PM (IST)

    सतीश उके, प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

    सतीश उके, प्रदीप उके यांना 6 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

    मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टाचा निर्णय

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात उके यांना अटक

    सतीश उके प्रदीप उके यांच्या अडचणी वाढल्या

  • 01 Apr 2022 06:04 PM (IST)

    सोलापूर बार्शीतील कासारवाडीच्या सीआरपीएफ जवानाला जम्मूत वीरमरण

    - सोलापूर  बार्शीतील कासारवाडीच्या सीआरपीएफ जवानाला जम्मूमध्ये कर्तव्य बजावत असताना आलं वीरमरण

    - हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती.

    - विठ्ठल खांडेकर असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव.

    - दीड वर्षात होणार होते सेवानिवृत्त, मात्र त्यापूर्वीच आले वीरमरण.

    - विठ्ठल खांडेकर यांच्या मृत्यूने संपूर्ण बार्शी तालुका शोकाकुल

  • 01 Apr 2022 05:46 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 10 एप्रिलला अमरावती दौऱ्यावर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 10एप्रिलला अमरावती दौऱ्यावर...

    10 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अमरावती विभागाची सवांद बैठक..

    आगामी महानगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक..

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार करणार पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन.

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील करनार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबोधित..

    अमरावती विभागातील राष्ट्रवादीचे सर्व मंत्री तसेच आमदार,सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी राहनार उपस्थित...

  • 01 Apr 2022 05:09 PM (IST)

    किरीट सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पुण्यात आंदोलन

    किरीट सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पुण्यात आंदोलन

    किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार करण्यास पुण्यात

    सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

  • 01 Apr 2022 04:51 PM (IST)

    महाराष्ट्रातील दुसरे शासकीय वन्यजीव उपचार केंद्र कराडला मंजूर

    नागपूर नंतर  महाराष्ट्रातील दुसरे शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) कराडला मंजूर

    7 कोटी 58 लाख  रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे  वर्ग

    सहकार मंत्री सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती

    पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांकरीता अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्य असे  वन्यजीव उपचार केंद्र कराड वराडे येथे होणार सातारा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी जिल्ह्यासह सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीचे उपचार मिळणार

  • 01 Apr 2022 03:54 PM (IST)

    मला असं वाटतं की मुख्यमंत्री कार्यालयानं खुलासा केला आहे : दिलीप वळसे पाटील

    मला असं वाटतं की मुख्यमंत्री कार्यालयानं खुलासा केला आहे

    कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, आम्ही परस्परांमध्ये चर्चा करुन निर्णय घेतो

    संजय राऊत यांची भावना बरोबर आहे आमच्या विभागाकडून कमतरता होईल असेल तर ती पूर्ण केली जाईल

    सुधीर मुनगंटीवार यांनी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर देणार नाही

    प्रत्येकजण आपल्या भावने प्रमाणं काम करत असतो आणि मांडत असतो

    पूर्वनियोजित बैठक होती, उद्या आमचे कार्यक्रम आहेत

    महाराष्ट्र पोलिसांनी 112  प्रकल्प सुरु केला आहे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा प्रकल्प सुरु करण्यात येईल

    100 नंबर प्रमाणं राष्ट्रीय पातळीवर एक नंबर असावा म्हणून 112 सुरु करण्यात येत आहे

  • 01 Apr 2022 03:12 PM (IST)

    महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असं ठरवलंय : संजय राऊत

    योग्यवेळी राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला हात घातला जाईल

    अजिबात विसंवाद नाही

    मुख्यमंत्री गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यात संवाद आहे

    संवाद साधत असतात, आदान प्रदान होत असतं

    राज्य अशा प्रकारे चालवायचं आहे

    राष्ट्रवादील मुख्यमंत्रीपद हवंय असं भाजपला वाटत

    मुख्यमंत्रिपद कुणाला नकोय सर्वांना हवं असतं

    महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे राहील असं ठरवलंय

    केंद्रीय तपास यंत्रणांसारखं अतिरेकी कारवाई करणार नाही

    कायदेशीर मार्गानं ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे तो घातला जाईल

  • 01 Apr 2022 02:28 PM (IST)

    माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास, ते उत्तम करत आहेत, मुख्यमत्र्यांकडून नाराजीच्या बातम्यांचं खंडण

    गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे

    अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

  • 01 Apr 2022 02:21 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यातील बैठक संपली

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यातील बैठक संपली

    दिलीप वळसे पाटील वर्षा निवासस्थानावरुन बाहेर पडले

  • 01 Apr 2022 12:52 PM (IST)

    शिवसेना आणि राष्ट्रावादीत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता

    शिवसेना आणि राष्ट्रावादीत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता…

    - मुख्यमंत्री पदासाठी एनसीपी ऊत्स्तुक असल्याची सुत्रांची माहीती…

    - गृहमंत्रीपद शिवसेनेनं घ्यावं आणि हव्या त्या कारवाया भाजप नेत्यांवर कराव्यात अशी खाजगीत चर्चा झाल्याची माहीती…

    - गृहखातं भाजपबाबत मवाळ असल्याने सेना अस्वस्थ, कांग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखिल नाराज असल्याची माहीती…

    - नारायण राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, किरीट सोमय्या , नितेश राणे , मोहीत कंबोज या सगळ्यांबाबत कारवाया करताना पोलीसांची कारवाई सुमार राहील्याची नेत्यांची टिका…

  • 01 Apr 2022 11:32 AM (IST)

    कॉंग्रेसला आणि नाना पटोलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय - नाना पटोले

    राजकीय विरोध असू शकतो

    गडकरीच्या विरोधात माझे ते माझे वकील आहेत

    रश्मी शुक्लाच्या प्रकरणात ते माझे वकील आहेत

    कॉंग्रेसला आणि नाना पटोलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय

    मुंबईची ईडी नागपूरात येऊन कारवाई करत

    कॉंग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही

    प्रत्येक कारवाईच्या मागे तपास यंत्रणांचा हात असतो

    आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटण गैर काय आहे

    कुणाच्या दबावाखाली येऊन कारवाई व्हायला लागली तर खूप अवघड आहे

    ब्लॅकमेलिंग करण्याचं काम जे भाजप करतंय, ते अत्यंत चुकीचं आहे.

    जे पोलिस अधिकारी कारवाई करत आहेत, त्यांच्यावरती देखील करवाई व्हायला हवी

    कॉंग्रेस पक्ष विकासाचं केंद्र आहे, सत्ता मिळाली तर त्याचा उपयोग सत्तेसाठी व्हावा

  • 01 Apr 2022 11:20 AM (IST)

    मेट्रो ३ चं काम जलद गतीनं व्हायला हवं होतं - देवेंद्र फडणवीस

    मेट्रो ३ चं काम जलद गतीनं व्हायला हवं होतं

    मेट्रो उद्घाटनावरून श्रेय घेतलं जात आहे.

    संजय राऊत रोज कायतरी बोलत असतात

    मी त्यांना महत्त्व देता, मी देत नाही

    अभ्यासक्रम पुर्वी पासून चालत आला आहे

    काही राजकरणी लोक अल्पसंख्याक

    सतिश उके यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 01 Apr 2022 11:06 AM (IST)

    6 एप्रिल रोजी धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव

    रत्नागिरी- कोकणातील रिफायनरीच्या दृष्टीनं 6 एप्रिल दिवस महत्त्वाचा!

    6 एप्रिल रोजी धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव

    जवळपास 5 हजार एकर जागा धोपेश्वर गावची असल्यानं ठरावाकडे लक्ष

    केवळ मतदान कार्ड असलेल्यांनाच ठरावामध्ये करता येणार मतदान

    तर, संभाव्य रिफायनरीची, क्रुड ऑईल टर्मिनलच्या जागेचा नकाशा देखील समोर

  • 01 Apr 2022 10:45 AM (IST)

    पैसे भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर हिसकावला

    पैसे भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर हिसकावला

    विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या

    यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगूडवार यांचं मृत विद्यार्थ्यांचे नाव

    महाविद्यालय प्रशासनावर नातेवाईकांची कठोर कारवाईची मागणी

    बडनेरा येथील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी मधील घटना

    मृतकाचे वडिल अशोक निरगुडवार यांची बडनेरा पोलीस ठाण्यात कॉलेज विरुद्ध तक्रार

  • 01 Apr 2022 10:44 AM (IST)

    पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

    नाशिक - पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर एप्रिल फुल आंदोलन

    मोदींचं चित्र असलेला केक कापून आणि गाजर वाटून पेट्रोल दर वाढीचा निषेध

    शंभरी अपार गेलेल्या पेट्रोल ची दरवाढ सुरूच असल्याने केलं आंदोलन

  • 01 Apr 2022 10:42 AM (IST)

    १६ वर्षाच्या मुलाकडून शिक्षकेच चोरी छुपे शूटिंग

    - १६ वर्षाच्या मुलाकडून शिक्षकेच चोरी छुपे शूटिंग,

    - शिकवणीसाठी घरी येणाऱ्या शिक्षकेच केलं शूटिंग,

    - मुलाला बालविकास अधिकाऱ्यासमोर हजर केलं जाणार

    - आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

    - बाथरूममध्ये लपून मुलाने केलं शूटिंग

  • 01 Apr 2022 10:41 AM (IST)

    स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीतील संसदेवर हल्लाबोल आंदोलन

    स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीतील संसदेवर हल्लाबोल आंदोलन.

    ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर दिल्लीवर दुपारी संसदेवर हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे.

    ११६ वर्षाची ही जुनी मागणी कायमची निकाली काढण्या करीता २०२३ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत विदर्भ राज्य मिळवण्याकरीता आंदोलन तीव्र करण्याकरीता ७ एप्रिल २०२२ रोजी नवी दिल्ली येथे जंतरमंतर वरून संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    विदर्भ राज्य आंदोलन समिती चे वामनराव चटप, माजी आमदार यांची माहिती

  • 01 Apr 2022 10:40 AM (IST)

    सुडाचं राजकारण आम्ही करत नाही एप्रिल फुल - संजय राऊत

    सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिल फुल

    सुडाचं राजकारण आम्ही करत नाही एप्रिल फुल

    पंधरा लाख तुमच्या खात्यात येणार एप्रिल फुल

    त्यांनी जमिनी लुटली असती, बळकावळी असती,

    ईडीने तपास करावा इतकं गंभीर प्रकरण ते नाही

    त्याच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या

    महाराष्ट्रातील पोलिस तपास करतील

    सतीश उके यांनी बेकायदेशीर कृत्य केलं असेल

    केंद्रीय तपास यंत्रणांना धुळीस मिळाल्या आहेत

    सत्य शोधावं लागेल

    सतीश उके अनेक दिवसांपासून प्रसिध्दीच्या झोतात आहे

    महाराष्ट्राच्या पोलिसांना जरी सुचना दिल्या,

    हिंदुचं नवीन वर्षे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य तणावमुक्त असावं

    मी माझं मतं सांगितलं

    गृह खात्याला महत्त्वाची पाऊलं टाकावी लागतील

  • 01 Apr 2022 10:07 AM (IST)

    उस्मानाबाद उष्माघाताचा जिल्यातील पहिला बळी

    उस्मानाबाद उष्माघाताचा जिल्यातील पहिला बळी

    लिंबराज सुकाळे वय वर्ष 50 या शेतकऱ्याचा मृत्यू

    शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिल्याने मृत्यू झाला, उष्माघाताचा झटका

    उपचारासाठी कळंब मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता झाला मृत्यू

    उष्माघाता ने मर्त्य झाल्याचे रुग्णालयातील डॉ नि केले घोषित

    कळंब तालुक्यातील हसेगाव ची घटना

    गेल्या 6 दिवसापासून उन्हाचा पारा गेला आहे चाळीशीच्या पार

    पारा वाढल्याने नागरिकांचे होत आहेत हाल

  • 01 Apr 2022 10:06 AM (IST)

    परभणी पेट्रोल प्राईज

    परभणी पेट्रोल प्राईज

    परभणीत आज पेट्रोल-डिजलच्या किमती वाढल्या नाहीत ,

    पेट्रोल:- 119.70 पैसे (वाढ नाही)

    डिजल:- 102.31 पैसे (वाढ नाही)

  • 01 Apr 2022 10:06 AM (IST)

    सोलापुरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अनोखे एप्रिल फूल आंदोलन

    - सोलापुरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अनोखे एप्रिल फूल आंदोलन

    - मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवकतर्फे अनोखा निषेध

    - मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल पंपावर केक कापून केला निषेध

    - एप्रिल फूल, कमल का फूल म्हणत कापला केक

  • 01 Apr 2022 09:40 AM (IST)

    उस्मानाबाद उष्माघाताचा जिल्यातील पहिला बळी

    उस्मानाबाद उष्माघाताचा जिल्यातील पहिला बळी

    लिंबराज सुकाळे वय वर्ष 50 या शेतकऱ्याचा मृत्यू

    शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिल्याने मृत्यू झाला, उष्माघाताचा झटका

    उपचारासाठी कळंब मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता झाला मृत्यू

    उष्माघाता ने मर्त्य झाल्याचे रुग्णालयातील डॉ नि केले घोषित

    कळंब तालुक्यातील हसेगाव ची घटना

    गेल्या 6 दिवसापासून उन्हाचा पारा गेला आहे चाळीशीच्या पार

    पारा वाढल्याने नागरिकांचे होत आहेत हाल

  • 01 Apr 2022 09:26 AM (IST)

    हसन मुश्रीफ आणि अनिल परब दोघांचा नंबर लागणार - किरीट सोमय्या

    - हसन मुश्रिफ यांनी जो शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला , घोटाळा केला, कोर्टातर्फे तपास करण्याचा आदेश दिला जाणार, त्यांच्या कारनाम्यांवर आजपासून कारवाईला सुरवात होणार…

    - यांनी घोटाळे केले, आम्ही भारत सरकारला तक्रार केली, त्यांनी तक्रार घेतलीये, आज सुनावणी होणार, १५८ कोटींचा घोटाळा… यात आत्ता इडी, कंपनी मंत्रालय, आयटी कारवाई करू शकते…

    - अनिल परब रोज ६ महिने बोलतात की माझा रिसाॅर्टशी संबंध नाही, परबांनो मोदी सरकारनेच याचिका दाखल केलीये, तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहाच… भारत सरकारची याचिका आहे, कोर्टाने दखल घेतलीये, १६ एप्रिलला सुनावणी आहे…

    - खरमाटे आणि सचिन वाझेंकडून पैसे घेतले आणि रिसाॅर्ट बांधला, कोवीडच्या नावाखाली, लाॅक डाऊन केला आणि घोटाळा केला… परबांनो बॅग भरा तयारी करा… imp

    - हसन मुश्रीफ आणि अनिल परब दोघांचा नंबर लागणार…

    - पवार कुटूंबियांना ग्लिसरिनचा सप्लाय यायचा म्हणून रडायचे.. पुढच्या आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखान्याचे २७ हजार शेतकरी मुंबईत येणार, इडी कार्यालयात जाणार…

    - अजीत पवार, शरद पवार यांनी घरच्या महिलांचा घोटाळ्यासाठी वापर केला…पवार परिवार शेतकर्यांना लुटणारं कुटूंब

    - महावसूली आघाडीची लूट.. सतिष ऊकेंचा घोटाळा बाहेर येणार.. किती जमिन ढापली मनी लाॅंड्रींग केली ते दाखवा…

    - मागचेया पाडव्याला मी यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा संकल्प सोडला पुढच्या पाढव्यापर्यंत या सगळ्या डर्टी डजनवर कारवाई झालेली असेल…

  • 01 Apr 2022 08:53 AM (IST)

    सतीश उके यांना मुंबई आणलं, ईडीच्या कोर्टात 11 वाजता हजर करणार

    सतीश उके यांना मुंबई आणलं, ईडीच्या कोर्टात 11 वाजता हजर करणार

    कोर्टात 11 वाजता हजर करणार

    विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आलं

    काल त्यांची सहा चौकशी केली होती.

  • 01 Apr 2022 08:15 AM (IST)

    पुण्यात आजपासून पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती

    - पुण्यात आजपासून पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती,

    - पहिल्या दिवशी हेल्मेटसक्तीला पुणेकरांकडून अल्प प्रतिसाद,

    - आजपासून शाळा, कॉलेज, आणि सरकारी कार्यालयात हेल्मेटसक्ती,

    - हेल्मेट नसल्यास कारवाई केली जाणार,

    - मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकरांकडून पुन्हा विरोध होण्याची शक्यता,

    - लाईव्ह फ्रेम चेक करा

  • 01 Apr 2022 08:15 AM (IST)

    अकोलेकरांना आज मिळाला दिलासा,आज अकराव्या दिवशी कुठलीही पेट्रोल डिझेलची दरवाढ नाही

    अकोलेकरांना आज मिळाला दिलासा,आज अकराव्या दिवशी कुठलीही पेट्रोल - डिझल ची दरवाढ नाही...

    काल दहाव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझल चे दर...

    पेट्रोल 84 पैसे ने वाढ़ 116.43 पैसे

    डीझल 83 पैसे ने वाढ़ 99.19 पैसे

    गेल्या 10 दिवसात पेट्रोल मध्ये 5.85 रुपयाने दरवाढ़ झाली तर डिझल मध्ये 5.8 पैशाने वाढ़ झाली आहे.....

  • 01 Apr 2022 08:08 AM (IST)

    भाजपा नेते किरीट सोमय्यांचा आज पुणे दौरा

    भाजपा नेते किरीट सोमय्यांचा आज पुणे दौरा

    पुणे दौऱ्यात डायरेक्टर जनरल ऑफ इनकम टँक्स संजय कुमार यांची घेणार भेट

    किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर आज कोण ? आज कोणाची तक्रार घेऊन किरीट सोमय्यां भेटणार

  • 01 Apr 2022 08:07 AM (IST)

    अमरावतीच्या दर्यापूर मधील येवदा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील राडा प्रकरण

    अमरावतीच्या दर्यापूर मधील येवदा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील राडा प्रकरण....

    मारहाण झालेल्या सामाजिक कार्यककर्ता नकुल सोनटक्केची आमदारा विरोधात थेट राज्यपाल,मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांकडे तक्रार...

    काँग्रेसस आमदार बळवंत वानखडे यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप...

    आमदार बळवंत वानखडे यांच्या वर कारवाई करण्याची तक्रारीत मागणी..

  • 01 Apr 2022 08:01 AM (IST)

    अमरावती इंधन दर

    अमरावती इंधन दर

    कालचे दर.... डिझेल 102.46 पेट्रोल 118.21

    आजचे दर.... डिझेल 100.10 पेट्रोल 117.37

    भाव उतरले... 84 पैशांनी पेट्रोल उतरले . 2.36 पैशाने डिझेल उतरले..

  • 01 Apr 2022 08:01 AM (IST)

    राज्यात आता मास्कसक्ती नसणार

    राज्यात आता मास्कसक्ती नसणार

    राज्यातला पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता ..

    पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू होती

    मात्र आता पुणेकर मोकळा श्वास घेणार आहेत..

    पुण्यात आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्यांकडून तब्बल 27 कोटीचा दंड वसूल करण्यात आलाय

    तर 5 लाख 58 हजार 618 जणांवर कारवाई करण्यात आल्याची नोंद आहे...

  • 01 Apr 2022 07:46 AM (IST)

    पुण्यात आज सीएनजीचे दर घटले

    पुण्यात आज सीएनजीचे दर घटले

    6 रुपये 30 पैशांनी सीएनजी स्वस्त

    पेट्रोल आणि डीझेलच्या कालच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही

    सीएनजीचा आजचा दर हा 62 .20 पैशांवर आहे

  • 01 Apr 2022 07:45 AM (IST)

    राज्यासाठी एप्रिल महीना ठरणार तापदायक

    राज्यासाठी एप्रिल महीना ठरणार तापदायक

    राज्यातील सर्वच भागात कमाल आणि किमान तापमानात होणार सरासरी वाढ

    कोकण, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा 7 टक्के वाढ होण्याची शक्यता

    तर मराठवाड्याचा दक्षिणेकडील काही भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 टक्के तापमानात वाढ होण्याची शक्यता

    हवामान विभागानं एप्रिल महिन्याचा अंदाज केला जाहीर

  • 01 Apr 2022 07:45 AM (IST)

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने चार परिक्षार्थींवर कायमची बंदी घातली

    पुणे

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने चार परिक्षार्थींवर कायमची बंदी घातली

    यामुळे या विद्यार्थ्यांना यापुढे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसता येणार नाही

    आयोगाविरोधात समाजमाध्यमावर शिवीगाळ करणे, बनावट प्रवेशपत्राचा वापर करणे, परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका बरोबर घेऊन जाणे या कारणांमुळे केली कारवाई

    शुभम नागरे, रामकिशोर पवार, मनोज महाजन, विठ्ठल चव्हाण अशी कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे

  • 01 Apr 2022 07:44 AM (IST)

    पुणे महापालिकेतील नगरसचिव विभागात उंदरांचा सुळसुळाट

    पुणे महापालिकेतील नगरसचिव विभागात उंदरांचा सुळसुळाट

    नगरसचिव विभागातील वातानुकूलित यंत्रणेच्या वायरी कुरतडल्या

    उंदरांमुळे नगरसचिव विभागातील रेकॉर्ड धोक्यात

    आतापर्यंत 8 उंदरांना जाळी लावून पकडलं...

  • 01 Apr 2022 07:43 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 140 एसटी बस रस्त्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अल्टिमेटम नंतरही अमरावती जिल्ह्यातील केवळ 85 एसटी कर्मचारी परतले कामावर....

    अल्टीमेटम च्या शेवटच्या दिवशी 31 मार्चला केवळ 15 कर्मचारी आले कामावर...

    26 ते 31 मार्च या पाच दिवसांत केवळ 85 कर्मचारी कामावर रुजू.

    अमरावती जिल्ह्यातीलही एस टी कर्मचारी विलनिकरनावर ठाम...

    आतापर्यंत एकूण 650 एसटी कर्मचारी परतले कामावर..

    1100 एस टी कर्मचारी अद्यापही संपात सहभागी...

    अमरावती जिल्ह्यातील 140 एसटी बस रस्त्यावर...

    विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांची माहिती...

  • 01 Apr 2022 07:33 AM (IST)

    लष्करी सेवेतील 200 कर्मचारी तर 151 सामान्य नागरिक असणार उपस्थित

    पुणे.. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिव सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पुर्णपणे बंद असणार

    नरवीर तानाजी रन या उपक्रमाचं आयोजन केल्यानं वाहनांना बंदी

    आर्मीचं दक्षिण मुख्यालय आणि इंद्राणी फाऊंडेशनच्या वतीनं रनचं आयोजन

    लष्करी सेवेतील 200 कर्मचारी तर 151 सामान्य नागरिक असणार उपस्थित

    लष्करातील महत्वाचे अधिकारी येणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आदेश...

  • 01 Apr 2022 07:32 AM (IST)

    आजपासून घर खरेदी महागली, मुद्रांक शुल्कात वाढ

    - आजपासून घर खरेदी महागली, मुद्रांक शुल्कात वाढ

    - नागपूरात मेट्रो अधिभार लागू, आजपासून भरावे लागणार ७ टक्के मुद्रांक शुल्क

    - नागपूरात घर, फ्लॅट, प्लॅाट रजिस्ट्रीवर १ टक्का अधिभार वाढला

    - आधीच महागाईचा भडका, त्यात मेट्रोचा भार सर्वसामान्यांवर

    - आजपासून खरेदीसाठी सात टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागणार

    - सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

  • 01 Apr 2022 07:24 AM (IST)

    मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक; महापालिका तिजोरीत 625 कोटींचा महसूल

    -मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक; महापालिका तिजोरीत 625 कोटींचा महसूल

    -वाढते शहर आणि महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक गाठला आहे

    -2021-2022 या सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून महापालिका तिजोरीत तब्बल 625 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. आज शेवटच्या दिवशी 50 कोटींचा कर वसुल झाला आहे

    -थेरगाव विभागीय कार्यालयातून सर्वाधिक 136 कोटी तर सर्वात कमी पिंपरी वाघेरे कार्यालयातून 6 कोटींचा कर जमा झाला. दरम्यान, मागीलवर्षीच्या तुलनेत 68 कोटी रुपये कर अधिक जमा झालाय

    -थकबाकादीरांवर धडक कारवाई केली. कोणाचा दबाव घेतला नाही. कर्मचा-यांना प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. त्यामुळे 625 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुल झाला आहे. मार्च अखेरमुळे नव्हे तर यापुढे सातत्यापूर्ण कर वसुल करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती करसंकलन विभागाकडून देण्यात आलीय

  • 01 Apr 2022 07:24 AM (IST)

    पालिकेचे वार्षिक उत्पन्न तब्बल सहा हजार कोटींवर पोचले

    - कोरोनाच्या दोन वर्षाचा सामना करूनदेखील पुणे महापालिकेने अर्थिक वर्षात उत्पन्नाचा इतिहास घडविला,

    - पालिकेचे वार्षिक उत्पन्न तब्बल सहा हजार कोटींवर पोचले

    - यामध्ये बांधकाम विभागाचा वाटा दोन हजार दोन कोटी रूपयांचा आहे,

    - तर मिळकत करातून एक हजार ८५० कोटी रूपये मिळाले आहेत.

    - राज्य सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटी परताव्यातून सुमारे अठराशे कोटी मिळाले आहेत.

  • 01 Apr 2022 07:23 AM (IST)

    डोंगरगाव शिवारात दोन अनोळखी युवकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ

    शहादा - डोंगरगाव शिवारात दोन अनोळखी युवकांचे मृतदेह आले आढळुन

    - दोन्ही युवकांनी ठिंबकच्या एकाच नळीने झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याच आले दिसुन

    - घटनेमुळे परिसरात खळबळ

    - दोन्ही युवकांची ओळख पटवण्यासाठी शहादा पोलीस करत आहे कसोशीचे प्रयत्न

    - साधारणत दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केल्या असल्याचा संशय

  • 01 Apr 2022 07:22 AM (IST)

    व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी सायकलीने प्रवास करत स्वीकारला पदभार

    व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी सायकलीने प्रवास करत स्वीकारला पदभार

    सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांची करण्यात आलीय नियुक्ती

    पदभार स्वीकारण्यासाठी लडकत यांनी पुण्याहून कोल्हापूर पर्यंत केला सायकल प्रवास

    बारा तासांच्या सायकल प्रवासानंतर लडकत पोहोचले कार्यालयात

    वरिष्ठ अधिकारी असताना सायकलने प्रवास करत नवे झाले गाठल्यानं लडकत बनले चर्चेचा विषय

  • 01 Apr 2022 07:02 AM (IST)

    13 वर्षानंतर मिळाला पडितेला न्याय

    देशात पहिल्यांदा बलात्काराच्या प्रकरणात डी एन ए चाचणीतून मतिमंद पीडित महिलेला मिळाला न्याय.

    १३ वर्षा आधी पीडितेने दिला होता बलात्काराच्या घटनेतून मुलीला जन्म.न्यायालयाने मुलीच्या जन्मा पासून लग्ना पर्यंत प्रति माह ५ हजार रुपये पोटगी देणायचा दिला निर्णय

    आरोपीच्या अचल संपती वर चढविला ८ लक्ष रुपयाचा बोझा.

    जिल्ह्यातील 'चलाना -धानला " या गावातील 2008 मधील प्रकरण..

    13 वर्षानंतर मिळाला पडितेला न्याय.

  • 01 Apr 2022 07:01 AM (IST)

    नागपूरातील सर्व शाळा आजपासून ७ ते १२ पर्यॅत

    - नागपूरातील सर्व शाळा आजपासून ७ ते १२ पर्यॅत

    - वाढत्या तापमानात शाळा दिवसभर सुरु ठेवणं शक्य नाही

    - शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या वेळात बदल

    - नागपूर मनपा आयुक्तांनी काढले ७ ते १२ पर्यॅत शाळा भरवण्याचे आदेश

    - १ ली ते ९ वी आणि ११ वी चे वर्ग ७ ते १२ पर्यॅत

  • 01 Apr 2022 07:01 AM (IST)

    मराठवाड्यात वाढतोय उन्हाळा चटका..

    मराठवाड्यात वाढतोय उन्हाळा चटका..

    मराठवाड्यातील जिल्ह्यात 40 ते 41 अंशावर गेले तापमान..

    तीन दिवस आणखी उन्हाचा तडाखा वाढणार असल्याची हवामान खात्याची माहिती..

    औरंगाबाद जिल्ह्यात सलग 2 वेळा पारा गेला 40 अंश सेल्सियस च्या पुढे..

    आगामी दिवसांत वाढते तापमान पाहता काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन..

  • 01 Apr 2022 07:01 AM (IST)

    प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बेड मिळणे झाले कठीण

    शासकीय घाटी रुग्णलायत प्रसूती वार्ड हाऊसफुल..

    प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बेड मिळणे झाले कठीण..

    यापूर्वी महिलांच्या उपचारासाठी जमिनीवर गाद्या टाकण्याची आली होती वेळ..

    उर्वरित उपचारासाठी महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी लावले फेटाळून..

    घाटी रुग्णालयात दिवसाला तब्बल 60 तर जिल्हा रुग्णालयात होतात फक्त पाच प्रसूत्या..

  • 01 Apr 2022 07:00 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोनाच्या नावे नवा घोटाळा उघड..

    औरंगाबादेत कोरोनाच्या नावे नवा घोटाळा उघड..

    मनपाच्या कोविड सेंटरमध्ये बोगस डिस्चार्ज बनवून नऊ जणांनी लाटला लाखोंचा विमा..

    बोगस डिस्चार्ज प्रमाणपत्र बनवून विम्याचे पैसे लाटणारी बोगस टोळी आली समोर..

    विमा कंपनीत आलेल्या 11 संशयित अर्जामुळे आला सदरील घोटाळा समोर..

    महानगरपालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटरच्या नावे बनवले बोगस कोविड डिस्चार्ज कार्ड..

  • 01 Apr 2022 07:00 AM (IST)

    हेल्मेट सक्तीच्या आदेशावर संभाजी ब्रिगेडची टिका

    हेल्मेट सक्तीच्या आदेशावर संभाजी ब्रिगेडची टिका

    मास्क काढला... आणि हेल्मेट लावला...!

    तोंडावरची सक्ती काढली अन् डोक्यावर लावली...!

    जिल्हाधिकारी साहेब, पहिले पुण्यातील रस्ते चांगले करा, पुण्यात चांगले स्पीड ब्रेकर निर्माण करा, खड्डेमुक्त रस्ते द्या, रस्त्यावरील बेकायदेशीर उभी वाहनं काढा,

    चौका-चौकात नुसती वसूली करणारे ट्राफिक पोलीस हटवा, पुण्यातील अनाधिकृत बॅनर हटवा, वाहतूक कोंडी हटवा, नागरिकांचे मणके खिळखीळे झालेत...

    त्यापासून दिलासा द्या. मग कडक नियम काढा. तुमची जुल्मी राजवट आम्ही सहन करणार नाही.

    संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांची टिका ..

  • 01 Apr 2022 07:00 AM (IST)

    पुण्यातील नाना पेठेत स्पेअर पार्ट लाकडी सामानाच्या दूकानाला लागली होती आग

    पुण्यातील नाना पेठेत स्पेअर पार्ट लाकडी सामानाच्या दूकानाला लागली होती आग

    10 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी विझवली आग

    आगीत चार जणांना झाली जखम

    अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर यांच्या पायाला तर फायरमन सुधीर नवले पायाला मुका मार लागला

    तीन तासानंतर आग आटोक्यात !

Published On - Apr 01,2022 6:10 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.