AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंची चिंता वाढली, आता पक्षात नाराजीचा विस्फोट, शिवसेना ठाकरे गटातून सर्वात मोठी बातमी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकताच काही खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यानंतर आता ठाकरे गटाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंची चिंता वाढली, आता पक्षात नाराजीचा विस्फोट, शिवसेना ठाकरे गटातून सर्वात मोठी बातमी
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 6:05 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला, त्यानंतर सचिन आहेर यांनी देखील उद्धव ठाकेर यांची साथ सोडली आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर बँक निवडणुकीमध्ये महायुतीसोबत गेले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठंं विधान केलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत नाराजी प्रचंड वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दानवे माझा नेता नाही, मी त्यांचा नेता आहे. दानवेंनी तिकडे जाऊन चूक केली, आमचा कोणताही शिवसैनिक त्यांचं काम करत नाही, असं खैरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

दानवे यांनी महायुतीसोबत जायला नाही पाहिजे होतं.  उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत हे प्रकरण गेलं आहे, ते यावर निर्णय घेतील. महाविकास आघाडीच्या बैठक घ्यायच्या, चर्चा करायच्या आणि लगेच उडी मारून तिकडे जायचं, हा स्वार्थ आहे. तरीसुद्धा लोक त्यांना पाडणार आहेत, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो.  दानवे माझा नेता नाही, मी त्यांचा नेता आहे. दानवेंनी तिकडे जाऊन चूक केली, आमचा कोणताही शिवसैनिक त्यांचं काम करत नाही. बाकीचं कुणीही त्यांचं काम करणार नाही, त्यांना चांगला धडा मिळेल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  सहकाराची जरी निवडणूक असली तरी आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आपण आपल्या पद्धतीने निवडणुका कराव्यात. आपण लढायचं बाकी कुणाबरोबर जायचं नाही, मग तुम्ही भाषण करून काय फायदा. हे मला आवडलं नाही, मी ताबडतोब वर कंप्लेंट करून टाकली आहे. आज मी तुमच्या टीव्हीमध्ये पाहिलं अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली, असं करू नये, असं खरै यांनी म्हटलं आहे. दरम्यान खैरे आणि दानवे यांच्यामधील दरी आता आणखी वाढत चालली आहे, त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर