“हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार, केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं”

दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil Delhi farmers protest)

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 15:16 PM, 27 Jan 2021
"हिंसाचारात भाजप सामील असल्याचा अपप्रचार,  केंद्राला जबाबदार धरणं चुकीचं"

सांगली : दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण (Delhi farmers protest riots) लागल्यानंतर देशभरात खळबळ उडालीये. त्यानंतर या हिंसाचारामागे नेमका कोणाचा हात असावा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे भाजपचा हात आहे असा दावा काही राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यानंतर दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. तसेच,दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला. (Chandrakant Patil said that bjp is not involved in Delhi farmers protest riots)

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी वरील उत्तर दिले. ते सांगलीत बोलत होते.

“दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारचे भान ठेवून वक्त्यव्य करावे. दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, त्यांनी केंद्र सरकारवर हिंसाचाराला जबाबदार धरण चुकीचं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिल्ली हिंसाचार आणि भाजपचं कनेक्शन काय?

दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताकदिनी फडकवण्यात आलेल्या झेंड्याबद्दल आणि उफाळलेल्या हिंसेबद्दल दीप सिंह सिद्धूला जबाबदार ठरवले जात आहे. हाच दीप सिहं सिद्धू काही फोटोंमध्ये भाजप खासदार सनी देओल यांच्यासोबत दिसतो आहे. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचारामागे भाजपचा हात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, दीप सिंह सिद्धूचा माझ्याशी कोणताही संबंध नसून तो फक्त निवडणुकांच्या वेळी माझ्यासोबत होता, असं स्पष्टीकरण सनी देओल यांनी दिलं आहे.

संबंधित बातम्या :

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्ली हिंसाचारात ज्याचं नाव समोर येतंय तो लक्खा सिधाना कोण आहे?

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(Chandrakant Patil said that bjp is not involved in Delhi farmers protest riots)