VIDEO | चंद्रपुरात दारूसाठ्यावर रोडरोलर, 3 कोटींच्या दारुचा चक्काचूर

ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा (Chandrapur liquor ban lifting) मोठा निर्णय घेतला होता.

VIDEO | चंद्रपुरात दारूसाठ्यावर रोडरोलर, 3 कोटींच्या दारुचा चक्काचूर
Chandrapur


चंद्रपूर : ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा (Chandrapur liquor ban lifting) मोठा निर्णय घेतला होता. दारुबंदी उठविल्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 कोटी रुपयांचा दारुसाठा रोडरोलर खाली नष्ट करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ठिकाणी हा दारुसाठा नष्ट करण्यात आला. तसेच अजूनही दारुसाठा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे. (Chandrapur Rs 3 crore worth of liquor was destroyed under the road roller)

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलनं केली होती. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याचा (Chandrapur liquor ban lifting) मोठा निर्णय घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 कोटी रुपयांचा दारूसाठा रोडरोलर खाली चिरडण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात ठिकाणी हा साठा नष्ट करण्यात आला. स्थानिक पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येत दारूसाठा नष्ट करण्यात आला. गेल्या 3 वर्षात केवळ घुग्गुस पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा दारूसाठा पकडण्यात आला होता. साधारण 388 दारूसंबंधित गुन्ह्यात हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तसेच येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील मालखान्यात असलेला दारुसाठा नष्ट करण्याची प्रक्रिया न्यायालयीन आदेशानुसार सुरूच राहणार आहे. (Chandrapur Rs 3 crore worth of liquor was destroyed under the road roller)

व्हिडीओ पाहा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI