सोने खरेदी करताय? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याचा किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

  • अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 12:41 PM, 17 Jan 2021
सोने खरेदी करताय? जाणून घ्या राज्यातील आजचे दर
सोने

जळगाव : काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याचा किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सुवर्णनगरी जळगावात सोन्याचा दर 50,300 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचा दर 66,620 रुपये प्रति किलो इतका आहे. कोरोनाच्या जीवघेण्या (Corona Vaccination) संसर्गानंतर आता लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात घट (Gold Silver price fall) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. (Check today’s gold rates in the Maharashtra)

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर (Gold international price)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या (Gold international price) दरात मोठी घसरण झालीय. आठवड्याच्या अखेरच्या व्यापार सत्रात फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव 23.55 डॉलरच्या घसरणीसह (-1.27%) 1827.85 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 0.98 डॉलर (-3.83%)) घसरणीसह 24.81 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर बंद झालाय.

जळगाव सराफा बाजार – आठवडाभरातील सोन्याचे भाव (प्रति ग्रॅम)

11 जानेवारी – 5 हजार 1 रुपये
12 जानेवारी – 5 हजार 1 रुपये
13 जानेवारी – 5 हजार 20 रुपये
14 जानेवारी – 5 हजार 16 रुपये
15 जानेवारी – 4 हजार 993 रुपये
16 जानेवारी – 4 हजार 954 रुपये
17 जानेवारी – 5 हजार 30 रुपये

मागणीला गती येणार (World Gold Council)

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) म्हणण्यानुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे सन 2020 च्या उत्तरार्धात सोन्याची मागणी कमी झाली आणि यामुळे किमती देखील खाली आल्यात. पण लवकरच मागणी वाढणार आहे. जर मागणीत तेजी आली, तर किंमत देखील वाढेल. जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक भारत आहे. WGC च्या माहितीनुसार, 2020 मध्ये बरेच सण साजरे केले जातात.

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 11 जानेवारीला MCX वर 5 फेब्रुवारी 2121 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत 48 हजार 786 रुपये प्रति तोळा होती. तर यापूर्वी 1 तोळा सोन्याची किमंत 48 हजार 967 रुपयावर बाजार बंद झाला होता. म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 265 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.

मागील आठवड्यात चांदीच्या दरात तेजी

गेल्या आठवड्यात शुक्रवारी 5 मार्च 2021 च्या वायद्याच्या चांदीची किंमत MCX वर 1 हजार 919 रुपयांच्या घसरणीसह प्रति किलो 64 हजार 764 रुपये राहिली. 11 जानेवारीला MCX वर चांदीचा भाव प्रतिकिलो 63 हजार 603 रुपये राहिला होता. त्यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 64 हजार 231 रुपये प्रति किलोवर राहिली होती. त्यानुसार चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात 533 रुपयांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा

Gold/Silver Rate Today: लसीकरणामुळे सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, वाचा आजचे दर

(Check today’s gold rates in the Maharashtra)