गेल्या दोन वर्षातील बॅकलॉग भरून काढा; Chhagan Bhujbal यांचं उद्योजकांना आवाहन

गेल्या दोन वर्षातील बॅकलॉग भरून काढा; Chhagan Bhujbal यांचं उद्योजकांना आवाहन
गेल्या दोन वर्षातील बॅकलॉग भरून काढा; Chhagan Bhujbal यांचं उद्योजकांना आवाहन
Image Credit source: tv9 marathi

नाशिकला अतिशय चांगलं हवामान लाभलं असून प्रदूषणकारी उद्योग शहराच्या बाहेर विकसित करण्यात यायला हवे. जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाले आहे.

भीमराव गवळी

|

Mar 18, 2022 | 2:54 PM

नाशिक: नाशिकला (nashik) अतिशय चांगलं हवामान लाभलं असून प्रदूषणकारी उद्योग शहराच्या बाहेर विकसित करण्यात यायला हवे. जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाले आहे. आता मुंबई-पुण्यानंतर नाशिक हे उद्योजकांसाठी महत्वाचे डेस्टिनेशन ठरत आहे. महाराष्ट्रात अधिक उद्योग यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जाणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सरकार काम करत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच कोरोनाचा प्रभाव संपला असून शासन विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करतस आहे. उद्योजकांनीही गेल्या दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढावा, असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केलं आहे.

छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक शहारातील डोंगरे वसतिगृह येथे नाशिक ‘आयमा इंडेक्स 2022’चे उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती, हिरा नंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण,रंजन ठाकरे, आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष वरूण तलवार, सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,मनीष रावल, सूर्यभान नाईकवाडे,सुदर्शन डोंगरे, सेक्रेटरी योगिता आहेर, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योजकांची प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविली जातील. नाशिक शहराला चांगलं हवामान लाभलं आहे. नाशिक हे मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असेल तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येईल. नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भुजबळांनी केले.

पहिल्याच दिवशी 850 कोटी रुपयांची गुंतवणूक

आयमा इंडेक्सच्या माध्यमातून 850 कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी झाली आहे. या सर्व उद्योजकांचे स्वागत करण्यात आले. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण तयार केले. नाशिकमध्ये एचएएलच्या माध्यमातून ओझर येथे विमानतळ विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाहिले उत्कृष्ट असे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. नाशिकच्या विमानतळावर पार्किंची सुविधा असल्याने याठिकाणी विमाने यावीत अशी मागणी आहे. मात्र पार्किंगसाठी दुसरीकडे पाठविली जात आहे. त्यासाठी आपला प्रयत्न कायम आहे. विमाने रिपेअरिंगसाठी नाशिकला प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन नाशिकच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या:

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी BJPने दोन नावं दिल्लीला पाठवली, पण पसंती सत्यजीत कदमांना

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

Holi Hain! मासे, चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची तुफान गर्दी, खवय्यांचा मांसाहारावर ताव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें