AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तयारीला लागा… छगन भुजबळांचा मोठा आदेश; जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी नेत्यांचा थेट निर्णय!

आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. भुजबळांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तयारीला लागा... छगन भुजबळांचा मोठा आदेश; जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी नेत्यांचा थेट निर्णय!
bhijbal and jarange
| Updated on: Sep 01, 2025 | 6:46 PM
Share

मुंबईत सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र ओबीसी समाजाचा या मागणीला विरोध आहे. आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. भुजबळांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मराठा आणि कुणबी एकच हे मानणं सामाजिक मूर्खपणा – भुजबळ

छगन भुजबळ यांनी आज ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, मराठा आणि कुणबी एकच हे मानणं सामाजिक मूर्खपणा. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी EWS आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज मागास नाही, सुप्रीम कोर्टाचे हे विधान आहे. तसेच सरकारने मराठा समाजाला आणखी 10 टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजातील लोकांना शेती, मग ते सर्व कुणबी का? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे.

भुजबळांचा कार्यकर्त्यांना आदेश

छगन भुजबळांनी म्हटलं की, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची आरक्षणाबाबतची जजमेंट्स दाखवली. त्यांना सांगितलं की आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊ. संविधानातून निर्माण झालेली ही कागदपत्रे आहेत. ही सर्वांना मान्य करावी लागतील. ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

चंद्रपूर शहरातील ओबीसी समाज उद्या निदर्शने करणार

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या विरोधात आता विदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच