AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आपल्या घरातला माणूस पडला; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मच्छिमारांनी आधी केली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरुन राजकारण तापले आहे. पण पुतळा पडल्यावर मच्छिमारांनी केलेली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

...आपल्या घरातला माणूस पडला; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मच्छिमारांनी आधी केली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
मच्छिमारांच्या कृतीने अंगावर येतील शहारे
| Edited By: | Updated on: Aug 29, 2024 | 9:07 AM
Share

नौदल दिनानिमित्त आठ महिन्यांपूर्वी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर हा पुतळा बसवण्यात आला होता. त्यानंतर राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. काल मालवणात त्यावरुन जो शिमगा झाला, तो उभ्या महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिला. या मुद्दावरुन राजकारण तापले आहे. पण पुतळा पडल्यावर मच्छिमारांनी केलेली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे.

4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पण आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरुन शिवप्रेमीं, सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट आहे. आता याप्रकरणी सरकारी सोपास्कार करण्यात येत आहेत. पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी चौकशीचे घोडे दामटण्यात आले आहे. विरोधकांनी या मुद्यावरुन रान पेटवले आहे. त्यावरुन मालवणमध्ये काला राडा, ड्रामा आणि राजकारणाचे इतर सर्व रंग पाहायला मिळाले. जनतेला या मुद्यावर राजकारण नको, तर निष्पक्ष चौकशी आणि दोषींना शिक्षा हवी आहे.

मच्छिमारांच्या कृतीने तुमचा भरुन येईल ऊर

डोळ्या देखत पुतळा पडला, आपल्या घरातला माणूस पडला, असे वाटले आणि माझ्या बोटी झाकण्यासाठी असलेली ताडपत्री पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी मी सहज दिली, अशी प्रतिक्रिया सुनील खंदारे यांनी दिली. पुतळा पडला तेव्हा त्यांनी तातडीने तो ताडपत्रीने झाकला. बोटी झाकण्यासाठी त्यांनी 40 हजारांची ताडपत्री आणली होती.

महाराजांपुढे या पैशांचे मोल काय?

पडलेला पुतळा झाकण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी तातडीने ताडपत्री दिली. स्थानिक मच्छिमार सुनील खंदारे यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता तातडीने ताडपत्री आणली आणि पुतळा झाकला. सरकारी अधिकारी पण वेळेत दाखल झाले. त्यांची ही कृती पाहून ते पण भारावले. या ताडपत्रीचे किती पैसे द्यायची अशी विचारणा त्यांनी खंदारे यांच्याकडे केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे या पैशांचं मोल काय, असा सवाल खंदारे यांनी केला. त्यावेळी सर्वांच्याच अंगावर शहारे आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यापासून त्याचे वेल्डिंग कमकुवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.