AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजारांहून अधिक स्टार्टअप, 2 लाख युवकांना AI प्रशिक्षण; महाराष्ट्राच्या टेक भविष्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्लॅनच सांगितला!

CM Devendra Fadnavis News: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे 'इनोव्हेशन हब' बनवेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

30 हजारांहून अधिक स्टार्टअप, 2 लाख युवकांना AI प्रशिक्षण; महाराष्ट्राच्या टेक भविष्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्लॅनच सांगितला!
| Updated on: Sep 30, 2026 | 5:08 PM
Share

वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि त्याच्या क्रियान्वयन या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे. हे सामर्थ्य आणि तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला नक्कीच भविष्यात जगाचे इनोवेशन हब बनवेल, असा आशावाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मित्रा या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य दीपक करंजीकर उपस्थित होते. स्पर्धेविषयी समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल यांनी माहिती दिली. त्यानंतर निवडलेल्या सहा चमूने आपल्या विषयावरील सादरीकरण केले. महाराष्ट्राला २०३५ पर्यंत संशोधनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा अविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष परिसंस्था या क्षेत्रांमध्ये नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह राज्याच्या कोणत्याही भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शक, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे. वर्गखोलीतील कल्पनेपासून जागतिक कंपनीपर्यंत आणि कल्पनेपासून प्रत्यक्ष परिणाम व जागतिक विस्तारापर्यंतची संपूर्ण नवोन्मेष साखळी महाराष्ट्रात उभी करण्यात येत आहे. हॅकेथॉनचा शेवट केवळ प्रमाणपत्र देऊन न होता त्यातील कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यामध्ये महत्वाचा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील एकूण स्टार्टअपपैकी १८ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप असून ही संख्या देशातील सर्वाधिक आहे. नव्या कल्पनांचे संशोधन, परीक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्टार्टअप, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्यातील पहिले समर्पित स्टार्टअप इन्क्युबेटर म्हणून ‘एम-हब’ विकसित करण्यात येत आहे.

नवी मुंबईत ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ अंतर्गत दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून एआय आधारित संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात एआय इन्क्युबेटर्स स्थापन करण्यात येतील. शासकीय डेटा युवा नवोन्मेषकांसाठी नव्या संशोधनाचा आधार ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील ८७ विद्यापीठे, सुमारे पाच हजार ५०० महाविद्यालये आणि ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची क्षमता बाळगतात. नव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या युवकांना शासन सातत्याने प्रोत्साहन देईल. २०१५ पासून मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाच्या सात तुकड्यांतील विविध क्षेत्रांतील युवा व्यावसायिकांना वरिष्ठ प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवोन्मेष ही प्रमुख प्रेरक शक्ती ठरणार आहे. जगासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि संरचना करण्याचे राज्याचे ध्येय असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...