AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, शेतीमध्ये…

राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्जमुक्तीबाबत सरकारकडून पॅकेजची घोषणा करण्यात आली. मात्र, विरोधकांकडून जोरदार टीका सरकारवर करण्यात आली. आता कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, शेतीमध्ये...
Devendra Fadnavis
| Updated on: Nov 17, 2025 | 12:12 PM
Share

मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतींचे मोठे नुकसान झाले. पाऊस इतका जास्त पडला की, फक्त पिकेच नाही तर शेतजमिनी आणि जनावरेही वाहून केली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र, जेवढ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले, त्यापुढे ही मदत खूपच कमी असल्याचे विरोधीपक्षाने म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट मराठवाड्याच्या दाैऱ्यावर गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का? याची माहिती घेतली. हेच नाही तर आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारनेही करावी, याकरिता उद्धव ठाकरे आग्रही आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर ते सतत सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठे विधान केले.

देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जे मिशन दिले आहे, नैसर्गिक शेतीचे त्यानुसार आपल्याला राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे. मी बियाणांच्या कंपन्यांना तशा प्रकारची विनंती केली आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण प्रत्येकवेळी सांगितले आहे की, कर्जमाफी महत्वाचीच आहे. पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये.

अंतिम उत्तर हे शेतीमध्ये शाश्वतता आणणे हे आहे. त्याकरिता शेती फायद्याची झाली पाहिजे. उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. उत्पादकता वाढवणे हाच यावरील उपाय आहे. याकरिता आपल्याला नवीन शेती पद्धत लागेल. शेतीच्या नवीन टेक्निक आपल्याला वापराव्या लागतील. त्यानुसार आपण स्मार्टसारखे प्रकल्प हातात घेतली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी विनम्र अभिवादन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता जर कर्जमाफी केली तर बॅंकांचा मोठा फायदा होईल. जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा फायदा होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या पथकाकडून नुकसानीची पाहणी उशिरा करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...