AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दिल्लीतून फडणवीसांकडे मोठी जबाबदारी, आता लवकरच…थेट लिस्टमध्ये नाव आल्याने चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपाने नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचे एका महत्त्वाच्या यादीत नाव आले आहे. त्यामुळे आता लवकरच फडणवीस नव्या भूमिकेत दिसतील.

मोठी बातमी! दिल्लीतून फडणवीसांकडे मोठी जबाबदारी, आता लवकरच...थेट लिस्टमध्ये नाव आल्याने चर्चा
devendra fadnavis
| Updated on: Oct 16, 2025 | 9:10 PM
Share

BJP Star Campaigners List For Bihar Election : सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असलेले देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे एक प्रमुख नेते आहेत. भाजपाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात त्यांच परवानगी घ्यावीच लागते. त्यांनी पक्षाला निवडणूक जिंकून दिल्यामुळे त्यांचे दिल्लीतही मोठे वजन आहे. दरम्यान, सध्या देशात बिहारच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, नितीश कुमार यांच्या युतीने जोर लावला आहे. हीच निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

नेमकी काय जबाबदारी सोपवली?

बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तेथील प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, ते आता प्रचारालाही लागले आहेत. दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांतर्गत रणनीती आखली जात आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपाने बिहारच्या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. म्हणजेच आता फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार आहेत. बिहार राज्य पिंजून काढून ते भाजपाच्या तसेच नितीश कुमार यांच्या उमेदवारांचा प्रचार करताना फडणवीस दिसतील.

स्टार प्रचारकांच्या यादीत मोदींचेही नाव

भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 स्टार प्रचारकांचे नाव आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. विनोद तावडे भाजपाचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी आहेत. महाराष्ट्रातून फडणवीस यांच्यासोबत तावडे यांचेदेखील या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे. दरम्यान, आता फडणवीस काही दिवसांनी बिहारच्या भूमीत प्रचारसभा घेताना पाहायला मिळणार आहेत.

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाकोणाची नावे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री नितन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, होन यादव, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य, सी आर पाटील, पवन सिंह, मनोज तिवारी, रवि किशन आदी नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.