AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी केली 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माणबद्दलची मोठी घोषणा, आता प्रत्येकाला…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या. शेतीविषयी त्यांनी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी केली 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माणबद्दलची मोठी घोषणा, आता प्रत्येकाला...
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:44 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांची आठवण देवेंद्र फडणवीस यांना आली. अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल मोठी घोषण देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना काही मोठ्या घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात आली. गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश केला जाईल. महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 23 हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील. 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे.

महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. राज्याला अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात अव्वल बनवणार आहोत. 250 पेक्षा अधिक स्टुडिओ बनवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मागच्यावेळी वेव्हज परिषद झाली. केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह सुरू करण्यात आली आहे. पुणे हे जीसीसीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे.

मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसीसाठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....