AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं अंतःकरण जड झाल… अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस भावूक, अजित पवार यांच्या…

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अर्थसंकल्प मांडताना त्यांना अजित पवार यांची आठवण झाली. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल अत्यंत मोठी घोषणा केली.

माझं अंतःकरण जड झाल... अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस भावूक, अजित पवार यांच्या...
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:26 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी काही मोठ्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्या. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. मागील काही दिवसांपासून अजित पवार या अर्थसंकल्पाची तयारी करत होते. देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडण्याकरिता उभे राहिले, त्यावेळीच अजित पवार अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. आता प्रत्येकाला अजित पवार यांची आठवण येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडत होते. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकासाबद्दल मोठा निधी घोषित करण्यात आला.

अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांची आठवण आली. अजित पवार यांच्या जाण्याने राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. विकसित भारत 2047 च्या विकासात आपला मोठा वाटा असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करणं हे आपलं ध्येय आहे. राज्याच्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसणार आहे.

हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. ⁠बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. ⁠सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरा केला जाईल.  ⁠बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील.

माझं अंतःकरण जड झाल आहे. अजित दादा यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच भव्य स्मारक उभारल जाईल. नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल, असेही मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...