मदरशाच्या नावाखाली मुलांची तस्करी, पोलिसांनी केली ५९ मुलांची सुटका

Crime News : रेल्वे पोलिसांनी तस्कारांवर मोठी कारवाई केली आहे. लहान मुलांची तस्कारी करणारे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 59 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे.

मदरशाच्या नावाखाली मुलांची तस्करी, पोलिसांनी केली ५९ मुलांची सुटका
Railway Police
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 11:18 AM

जळगाव : रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांनी मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड केले आहे. मुलांची तस्करी उघड होऊ नये म्हणून त्यांना मदरसाचा ड्रेस परिधान करुन त्यांची तस्करी केली जात होती. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. या 59 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. मुलांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या प्रकारामुळे तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार आहे.

काय आहे घटना बिहार राज्यातून 59 मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करीसाठी घेऊन जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या तस्कारीचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. बिहार राज्यातून पूर्णिया येथून लहान मुलांना दानापूर-पुणे एक्स्प्रेसने बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली. मग पोलिसांनी सापळा रचला.

Railway Police

दानापूर पुणे ही गाडी भुसावळ स्थानकावर येताच कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर 30 मुले साप़डली आहेत. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हे सुद्धा वाचा

चार आरोपींना अटक

रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांची तस्करी होत असल्याची टीप पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेने दिली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. यामधील २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिकमध्ये पाठवले. पोलिसांनी चार तस्करांवर भादंवि 370 नुसार गुन्हा नोंदवला आहे. तर एका तस्कराविरोधात 370 IPC मनमाडमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलांची वैद्यकीय तपासणी केली आहे. मुलांची ओळख पटवल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.