Special Report | चित्रा वाघ VS जितेंद्र आव्हाड, ट्विटरवर हल्लाबोल

विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी आव्हाडांना अनंत करमुसे प्रकरणाची आठवण करुन दिली. त्यानंतर आता आव्हाडांनीही चित्रा वाघांना थेट सवाल केलाय.

Special Report | चित्रा वाघ VS जितेंद्र आव्हाड, ट्विटरवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 11:36 PM

मुंबई : सध्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आमनेसामने आलेत. अनंत करमुसे प्रकरणाच्या टीकेवरुन आव्हाडांनी चित्रा वाघ यांना ट्विटरद्वारे सवाल केलाय. ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्विटर फेसबूकचा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला. चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या. 2016 ते 2020 त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा

आव्हाडांवर भाजपच्या रिदा राशीद यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाडांनी पोलीसी अत्याचारा विरोधात लढणार असल्याचं सांगून आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन चित्रा वाघ यांनी अनंत करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत आव्हाडांवर टीका केली होती.

जितेंद्र आव्हाडांनी घरात बोलावून एकाला मारहण केली होती. आणि आता ते नैतिकतेचे धडे देत आहेत, असं चित्रा वाघ म्हणाल्यात. चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेलं अनंत करमुसे मारहाण प्रकरण काय आहे.

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर आव्हाडांनी टीका केली होती त्यानंतर 5 मे 2020 ला करमुसेंनी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळं आव्हाडांच्या सुरक्षा रक्षकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्याच निवासस्थानी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला असून त्यांना अटकही झाली होती. गेल्याच महिन्यात करमुसेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून मारहाण प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशीची मागणी केलीय. त्यावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

तर इकडे विनयभंगाचे आरोप आव्हाडांनी पुन्हा एकदा फेटाळला असून पोलिसांना गुन्हा सिद्ध करताना नाकीनऊ येईल असं आव्हाडांनी म्हटलंय.

सध्या आव्हाडांना अटकपूर्व जामीन मिळालाय. तर पोलिसांकडूनही ज्या व्हिडीओच्या आधारे आरोप झालेत त्याची चौकशी सुरु आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.