AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको, कृतीत दाखवा, चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं

छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको, कृतीत दाखवा, चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले.
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 31, 2020 | 3:29 PM
Share

रायगड : पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतीव वेदनादायी आहे. राज्यात आज 60 वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असं आवाहन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केलं आहे. (Chitra Wagh challenges CM Uddhav Thackeray over increasing Rape cases)

“महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पेणमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीवर, जिने अद्याप आयुष्यही पाहिलं नाही, हसण्या-बागडण्याचे दिवस असताना तिच्यावर निर्घृण बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोरोना काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, की त्यांना न्यायालयाला विनंती करावी, की महिलासंबंधी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना कोरोना काळात जामीन किंवा पॅरोलवर सोडण्यात येऊ नये” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती”

“आमच्या मागणीची विचार न झाल्यामुळे संबंधित आरोपीने जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा असं दुष्कृत्य केलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लातूरमध्ये साठ वर्षीय महिलाही बलात्कारासारख्या गलिच्छ प्रकारातून सुटलेली नाही. म्हणजे साठ वर्षांची वयोवृद्ध आजी असू देत किंवा अडीच तीन वर्षांची चिमुरडी, बलात्काराला बळी गेल्या. आज राज्यात महिला सुरक्षा किंवा सक्षमीकरण हे फक्त घोषणेपुरतं उरलं आहे. मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या” असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या झाल्याचं बुधवारी समोर आलं होतं. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा हे दुष्कृत्य केलं. या प्रकरणी आरोपीला अटक करुन चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

“नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार, आता ‘तो मी नव्हेचं'”, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

(Chitra Wagh challenges CM Uddhav Thackeray over increasing Rape cases)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...