CIDCO | सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ, नवी तारीख जाहीर

घरांचे हफ्ते भरण्यास 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे.

CIDCO | सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ, नवी तारीख जाहीर
MNS Bomba Maro Agitation
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 9:32 PM

नवी मुंबई : सिडकोच्या 2018 मधील गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना (CIDCO Gave Extension To Pay House Installments) घरांचे हफ्ते भरण्यास 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. कोव्हिड-19 आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे (CIDCO Gave Extension To Pay House Installments).

सिडकोच्या 2018 मधील गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांसाठी नवी मुंबईतील 5 नोडमध्ये एकूण 14,838 घरे (सदनिका) उपलब्ध करुन देण्यात आली होती. या योजनेची संगणकीय सोडत 2 ऑक्टोबर 2018 रोजी यशस्वीरीत्या पार पडली होती. कोव्हिड-19 मुळे लागू करण्यात आलेली देशव्यापी टाळेबंदीमुळे शुल्क भरण्यास येणार्‍या अडचणी, आर्थिक समस्येचा करावा लागणारा सामना तसेच सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असणे, या बाबींचा विचार करुन यापूर्वीच सदनिकांचे हफ्ते भरण्यास 30 जून 2020 आणि त्यानंतर 29 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, सदनिकांचे हफ्ते भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जदारांकडून करण्यात आल्याने सिडकोतर्फे आणखी तीन महिन्यांची म्हणजे 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे (CIDCO Gave Extension To Pay House Installments).

नव्याने जाहीर केलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांपैकी कोणत्याही हफ्त्याची रक्कम भरली असेल अशा अर्जदारांना आणखी तीन महिने म्हणजेच एकूण नऊ महिने मुदतवाढ (24 मार्च 2020 ते 28 डिसेंबर 2020) देण्यात येऊन टाळेबंदीच्या सुरुवातीपासून म्हणजेच 24 मार्च 2020 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वीच वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांची पूर्ण रक्कम भरली असेल व टाळेबंदीच्या कालावधीमध्ये ज्यांना पाचवा आणि सहावा हफ्ता भरणे शक्य झाले नसेल, अशा अर्जदारांनादेखील आणखी तीन महिन्यांची म्हणजेच एकूण नऊ महिन्यांची (24 मार्च 2020 ते 28 डिसेंबर 2020) मुदतवाढ देण्यात आली असून कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही.

ज्या अर्जदारांनी वाटपपत्रानुसार पहिल्या हफ्त्याच्या दिनांकापासून म्हणजे 24 ऑक्टोबर 2019 पासून अतिरिक्त दिलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच 29 सप्टेंबर 2020 पर्यंत कोणत्याही रकमेचा भरणा केलेला नाही, अशा अर्जदारांचे वाटपपत्र रद्द करण्यात येणार आहे.

CIDCO Gave Extension To Pay House Installments

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा, विजेत्यांना खेळण्यातील विमान आणि हेलिकॉप्टर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.