AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: ठाकरे ब्रँडचा बाजा…फडणवीसांचा थेट हल्लाबोल, बाळासाहेबांवर केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

भाजपच्या वतीने आज मुंबईत विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर सडकून टीका केली आहे.

Devendra Fadnavis: ठाकरे ब्रँडचा बाजा...फडणवीसांचा थेट हल्लाबोल, बाळासाहेबांवर केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!
Fadnavis and Thackeray (1)
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 16, 2025 | 9:21 PM
Share

भाजपच्या वतीने आज मुंबईत विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महत्त्वाचे नेते हजर होते. या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर सडकून टीका केली आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

ब्रँडचा बँड-बाजा वाजला

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या निवडणुकीपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांनी ही युती म्हणजे ठाकरे ब्रँड असं बोललं जात होतं. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं कशाला पक्षावर लढायचं. पण काहीजण म्हणाले आमचा ब्रँड आहे. आमचे शशांक राव, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ब्रँडचा वाजवला बँड, बँड-बाजा वाजला अशा शब्दात ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीत. नुसतं नाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही. आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जगामध्ये जागतिक ब्रँड म्हणून जगात स्थापित झाला आहे. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कुणी ब्रँड सागू नये. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे.

मुंबईच्या महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाचं झेंडा फडकणार असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘आज माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की काहीही झालं तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झालं तरी मुंबई पालिकेवर महायुतीचंच सरकार येणार’.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...