AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल करणार? लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट

Devendra Fadnavis : "सर्व गोष्टी नीट प्रोसेसने केल्या आहेत. कोणी KYC करणार असेल तर आजही लाभ द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. इतका मोठा लाभ दुसऱ्या कुठल्याही राज्यात मिळत नाही" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis : त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल करणार? लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची अपडेट
Devendra Fadnavis
| Updated on: Jun 02, 2026 | 1:01 PM
Share

“आपण लाडकी बहिण योजना सुरु केली, तेव्हा त्या संदर्भात काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितलेला. कागदपत्राच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती. त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून लाडक्या बहिण योजनेचा लाभ द्यायला सुरुवात केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पण आपण जेव्हा सरकारी पैसा खर्च करतो, तेव्हा CAG ऑडिट होतं. निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाहीत याची माहिती द्यावी लागते. म्हणूनच योजना सुरु झाल्यावर KYC सुरु केलं. वेगवेगळ्या डेटाबेसची तुलना सुरु केली. इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांचं जिथून पेमेंट होतं त्या पोर्टल मधून मीहिती घेतली. परिवहन विभाग आहे, मोटर मालकी कोणाकडे आहे याची माहिती घेतली. रेशनकार्डच्या माध्यमातून डेटा बेसची माहिती घेतली. ही सगळी माहिती एकत्र केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“तेव्हा लक्षात आलं की, पाच लाख लोक अशी आहेत, ज्यांच्या घरात सरकार नोकरी आहे. त्यात 14 हजार पुरुष निघाले . जवळपास 10 लाख लोकांचं उत्पन्न अडीचलाखापेक्षा जास्त आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमधून जे लोक अपात्र ठरले, त्यांना अपात्र ठरवलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणाकडून पैसे वसूल करणार?

“आधी जी माहिती दिली ती सेल्फी सर्टिफिकेशननुसार सत्य मानली. नंतर जी माहिती दिली, त्याची केवायसी कागदपत्र मागितली. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झालं नाही. ज्यांना अर्ज करता येतो, त्यांना KYC करता येत नाही, असं मानता येणार नाही. पण 9 महिने पाठपुरावा केल्यानंतर कुठला तरी एखादा निकष पार पाडता येत नाही, म्हणून केवायसी केली नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आता या ठिकाणी जो काय आकडा दिला, 60 लाख, 80 लाख ते योजनेचे निकष पूर्ण करताना दिसत नाहीत. 1 कोटी 70 लाख महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात. त्यांनी KYC पूर्ण केलं आहे. त्यांना लाडक्या बहिण योजनेचे पैसे मिळत राहतील. पण ज्या बहि‍णींनी केवायसी केली नाही त्यांना पैसे मिळणार नाही” हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जातील हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शेतकरी कर्जमाफी कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले?

“शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्यावर निर्णय घेईल. निवडणूक आयोगाने अट टाकली आहे की या विषयाची घोषणा करता येणार नाही. तुम्ही विषय मंजूर करुन पुढील कार्यवाही सुरु करा असं सांगितलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अटीमुळे घोषणा करता येणार नाही. पण निवडणूक संपल्यावर घोषणा करु” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा