ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, राज्यात तब्बल 34 कोटींहून अधिकची गुंतवणूक, हजारो रोजगार उपलब्ध

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. (State Government signs MoU with 15 companies)

ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार, राज्यात तब्बल 34 कोटींहून अधिकची गुंतवणूक, हजारो रोजगार उपलब्ध
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 9:29 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यात 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे सुमारे 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. (State Government signs MoU with 15 companies)

“गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. गेल्या सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. जवळपास 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. हा उद्योग खात्याचा अभिमान असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट

“आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत फक्त बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.(State Government signs MoU with 15 companies)

संबंधित बातम्या : 

फ्रान्स हा स्वातंत्र्य मानणारा देश, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं, मोदींपाठोपाठ शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

US Election 2020: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक निर्णायक 10 मुद्दे

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.