AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार, आता जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन

येत्या पाच सप्टेंबरला जे आंदोलन होणार आहे, ते आंदोलन या आधी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठं असेल, दुर्दैवाने हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे, असं यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार, आता जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन
abhijeet dipke Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 7:43 PM
Share

सीजेपीच्या वतीने दिल्लीमधील जंतर -मंतरवर मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडून आणखी एका आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पाच सप्टेंबर रोजी एक शांततापूर्ण मोर्चा निघणार आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जे आंदोलन झालं होतं, त्यानंतर 25 जुलै रोजी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती, ती आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत, या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना जी आश्वासनं देण्यात आली होती, ती अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत. सरकार म्हणत आहे की, कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही, पण कोर्ट म्हणतं आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त लिस्ट द्या, मात्र सरकार यादी देत नाही. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यामुळे आता जंतर -मंतरवर जे आंदोलन झालं, त्याहीपेक्षा मोठं आंदोलन दिल्लीमध्ये होणार आहे, असा इशारा यावेळी अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची आज वेळ का आली?  जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचं ते लास्ट ऑप्शन असतं, तिथं सरकार त्यांना मजबूर करतं. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराच्या संधी दिली असती तर मनोज जरांगे यांना आंदोलन करावं लागलं असता का? असा सवाल यावेळी दिपके यांनी उपस्थित केला आहे.

हे सरकारचं अपयश आहे, आज राज्यात सगळेच आंदोलन करत आहेत. मराठा समाजात देखील शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यांना रोजगाराच्या संधी सुद्धा मिळत नाहीत.  हे सरकारचं अपयश आहे की त्यांना आंदोलन करावं लागतं, आम्हाला तरी आंदोलन करायला कुठे आवडतं, परंतु आम्हाला तब्बल 35 दिवस सरकारने बसून ठेवलं, असंही यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?