‘माझ्या अश्रूंवर मुनगंटीवारांनी टीका केली, मी एक विधवा महिला त्यांना माफ करणार नाही’, प्रतिभा धानोरकर कडाडल्या

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत आता ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भाषणात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या अश्रूंवर टीका केली. मी एक विधवा महिला त्यांना कधीच माफ करणार नाही", अशा शब्दांत प्रतिभा धानोरकर कडाडल्या आहेत.

'माझ्या अश्रूंवर मुनगंटीवारांनी टीका केली, मी एक विधवा महिला त्यांना माफ करणार नाही', प्रतिभा धानोरकर कडाडल्या
प्रतिभा धानोरकर यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 5:55 PM

महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडेदेखील खिळल्या जाणार आहेत. कारण या मतदारसंघात आता काँटे की टक्कर बघायला मिळतेय. भाजपकडून या मतदारसंघातून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं आहे. तर काँग्रसकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे एकमेव असे काँग्रेसचे उमेदवार होते जे मोदी लाटेत जिंकून आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एकाच जागेवर जिंकता आलं होतं. ती जागा चंद्रपूरची होती. बाळू धानोरकर यांनी ही जागा जिंकली होती. बाळू धानोरकर यांचं गेल्यावर्षी मे महिन्यात निधन झालं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रतिभा धानोरकर या प्रतिभावंत आणि प्रभावशाली नेत्या आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द तर हेच सांगतंय. काही दिवसांपू्र्वी त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींची दिल्लीत जावून भेट घेतली होती. त्यानंतर प्रतिभा धानोकर यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली.

‘मुनगंटीवार यांनी माझ्या अश्रूंवर टीका केली’

विशेष म्हणजे चंद्रपूरच्या जागेवर विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. तसेच त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यादेखील इच्छुक असल्याची चर्चा होती. पण पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. यावरुन त्या फायरब्रँड नेत्या आहेत हे लपून राहिलेलं नाही. धानोरकर यांनी यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या अश्रूंवर टीका केली. मी एक विधवा महिला त्यांना कधीच माफ करणार नाही”, असं प्रतिभा धानोरकर आपल्या भाषणात म्हणाल्या. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीदेखीस आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला त्यांनी माफ करावं हा विषय नाही. पण मी त्यांना माफ करेन”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रतिभा धानोरकर नेमकं काय म्हणाल्या?

“घरचा कुटुंबप्रमुख, घरचा माणूस निघून गेल्यानंतर त्या घरच्या बाईची अवस्था काय होते? या संघर्षाचा सामना करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. त्याचबरोबर माझ्यावर राजकीय जबाबदाऱ्या देखील आल्या. या सर्व जबाबदाऱ्या पार पडत असताना दोन अश्रू डोळ्यांमधून निघाले असतील तर अश्रूंचं देखील विरोधी पक्षाचे नेते भांडवल करतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी एक विधवा महिला म्हणून त्यांना माफ करणार नाही. माझ्या भागातल्या सर्व ज्या महिला बसलेल्या आहेत त्या कदापि त्यांना माफ करणार नाहीत. कारण हा अपमान फक्त माझ्या एकटीचा नाही. तर माझ्या भागातील प्रत्येक व्यक्तीचा अपमान त्यांनी केला आहे”, असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या

सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर काय?

“मला त्यांनी माफ करावं हा माझा काही विषय नाही. मी त्यांना माफ करेन हे निश्चित आहे. प्रश्न असा आहे की, मी असं म्हणालो की, निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. याच्यात मग काय चूक आहे? तुम्हाला वाटत नाही की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी? निवडणूक ही व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप यावर होऊ नयेत. मी व्यक्तीगत टीकेच्या विरुद्ध आहे. त्यांनी खूप टीका केली. मला ताप होता. त्याचीसु्द्धा टीका केली. मला तीन दिवस ताप होता. त्याचीसुद्धा त्यांनी गंमत केली. ठिक आहे, त्यांना खालचं राजकारण करु द्या. मला तर आता देशात राजकारण करायचं आहे”, असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.